पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कुर्ल्यात ६ वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार; आरोपी अटकेत

पुण्यात चिमुरडीवर बलात्कार

देशभरातील महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. हैदराबाद येथे डॉक्टर महिलेवर सामुहिक बलात्कार आणि हत्या प्रकरण ताजे असताना मुंबईमध्ये ६ वर्षाच्या चिमुकलीवर बलात्काराची घटना घडली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील कुर्ला परिसरामध्ये राहणाऱ्या ६ वर्षाच्या मुलीवर एका व्यक्तीने बलात्कार केला आहे.

आर्थिक मंदीवर मात करण्यासाठी केंद्र सरकारने नक्की काय केलं वाचा...

कुर्ला पोलिसांनी याप्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. पीडित चिमुकलीवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेमुळे कुर्ला परिसरामध्ये खळबळ उडाली आहे. आतापर्यंत महिला आणि मुलींच्यासाठी मुंबई शहर सुरक्षित असल्याचे म्हटले जायचे. मात्र मुंबईत देखील महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. 

नासाच्या दाव्यानंतर इस्रो प्रमुखांनी विक्रम लँडरबद्दल दिली ही

हैदराबाद येथील डॉक्टर महिलेवर सामुहिक बलात्कार त्यानंतर तिला जिवंत जाळून टाकले. या घटनेमुळे संपूर्ण देश हादरला आहे. अशामध्ये उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश या ठिकाणी बलात्काराच्या घटना समोर आल्या. त्यानंतर आता मुंबईमध्ये चिमुकलीवर बलात्काराची घटना झाली आहे. अशा नराधमांना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी देशभरातील जनतेकडून केली जात आहे. 

जम्मू-काश्मीरमध्ये हिमस्खलन; ४ जवान बेपत्ता