पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मुंबईतील 'या' ६ विभागात कोरोनाचे ५३% रुग्ण

मुंबई

मुंबईत कोरोना विषाणूची बाधा झालेल्या रुग्णांची संख्या रविवारी झपाट्यानं वाढली. मुंबईत रविवारी एकाच दिवशी ८१ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे रविवारी दिवसाअखेर मुंबईत कोरोना बाधितांचा आकडा हा ४५८ वर पोहोचला. राज्यात मुंबईत कोराना रुग्णांची संख्या ही सर्वाधिक आहे. यात मुंबईतील प्रभादेवी, वरळी, मलबार हिल, अंधेरी, भायखळा  आणि मालाडमध्ये सर्वाधिक पॉझिटीव्ह रुग्ण आढळले आहे. एकूण रुग्णांपैकी ५३ टक्के रुग्ण हे या भागात आहेत.

कुपवाड्यातील चकमकीत ५ दहशतवाद्यांचा खात्मा, ५ जवान शहीद

मुंबई महानगर पालिकेच्या माहितीनुसार ३३० पॉझिटीव्ह रुग्णांपैकी  १७५ रुग्ण हे वरील सहा विभागातील आहेत. वांद्रे (पू.), चेंबूर, देवनागर, घाटकोपरमध्ये कोरोनाचे डझनावरी रुग्ण आहेत तर बोरिवली, दहिसर, मुलुंड आणि कुर्ल्यात कोरोना रुग्णांची संख्या ही २ ते १० च्या दरम्यान आहे. 

विभाग आणि रुग्णांची संख्या
जी दक्षिण : वरळी, प्रभादेवी — ५८
डी : मलबार हिल, ग्रँट रोड, चौपाटी — ३१
के पश्चिम : अंधेरी, ईर्ला, जुहू, ओशिवारा — २५

लॉकडाऊनः हरभजन सिंग ५ हजार कुटुंबांना वाटणार धान्य

खुद्द मुंबई शहरात १३७ रुग्ण आहेत, मुंबई पश्चिम उपनगरात कोरोना रुग्णांची संख्या ही ११८ वर आहे तर पूर्व उपनगरीय भागात रुग्णांची एकूण संख्या ही ७५ वर आहे. मुंबई शहरात १३७ पैकी ९० रुग्ण हे मध्य मुंबईतील आहेत तर ४७ हे दक्षिण मुंबईतील आहे.