देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई कोरोनामुळे गेल्या काही दिवसांपासून थांबली आहे. राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत असताना मुंबईत सर्वाधिक रुग्ण आढल्याचे समोर येत आहे. पीटीआयने बृहमुंबई महानगर पालिकेच्या आकडीवारीनुसार दिलेल्या वृ्त्तानुसार शनिवारी एकट्या मुंबईत तब्बल ५२ नवे रुग्ण आढळले असून याठिकाणी ४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मुंबईत आतापर्यंत ३३० रुग्ण आढळले असून मृतांचा आकडा हा २२ वर पोहचला आहे.
कोरोनाविरोधातील लढा एकत्रित लढू, मोदी-ट्रम्प यांच्यात एकमत!
राज्यातील उपाययोजनेच्या संदर्भात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विटरच्या माध्यमातून माहिती दिली आहे. राज्यात आवश्यक ती उपकरणे उपलब्ध आहेत. २५ हजार पीपीई कीट्स, दीड हजार व्हेंटीलेटर आणि दीड लाख मास्क उपलब्ध करुन देण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. राज्यात आणखी नवी व्हेंटीलेटर मागवण्यात आली आहेत. गरज पडल्यास केंद्राकडून आणखी साहित्याची मागणी करण्यात येईल, असा उल्लेखही राजेश टोपे यांनी आपल्या ट्विटमध्ये केलाय.
नागरिकांनी आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढावी यासाठी योग्य आहार, व्यायाम करावा, असा सल्लाही आरोग्यमंत्र्यांनी दिलाय. याशिवाय सोशल डिस्टन्सिंगचे नियम सक्तीने पाळावे, असे आवाहन पुन्हा एकदा त्यांनी राज्यातील जनतेला केले आहे.
लॉकडाऊनमधून राज्य टप्प्याटप्यातून बाहेर पडेल, राजेश टोपेंनी दिले संकेत
52 new coronavirus cases reported in Mumbai on Saturday, four patients died: BMC
— Press Trust of India (@PTI_News) April 4, 2020
सध्याच्या घडीला राज्यातील वाढता आकडा लक्षात घेता देशव्यापी लॉकडाऊननंतरही महाराष्ट्रातील संचारबंदी १४ एप्रिलनंतरही वाढवण्यात येणार असल्याचे संकेत राजेश टोपे यांनी यापूर्वीच दिले होते. राज्यातील संचारबंदी एकदम न हटवता टप्प्याटप्याने परिस्थितीनुसार निर्णय घेतला जाऊ शकतो. मुंबईतील परिस्थिती पाहता याठिकाणी लॉकडाऊन कायम राहण्याची शक्यता आहे.