पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

चारित्र्यावर संशय घेऊन पतीचा पत्नीवर चाकूहल्ला, नंतर स्वतःचा गळा कापून आत्महत्या

प्रातिनिधिक छायाचित्र

पत्नीचे दुसऱ्या पुरुषाशी संबंध असल्याच्या संशयावरून विरारमध्ये एका ५२ वर्षांच्या पतीने त्याच्या पत्नीवर चाकूने वार केले. यानंतर संबंधित पतीने चाकूने स्वतःचा गळा कापून घेतला आणि इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी मारली. या घटनेत संबंधित पती मृत पावला असून, त्याची पत्नी जखमी झाली आहे. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अमित शहांचे कौतुक करताना मुकेश अंबानी काय म्हणाले माहितीये?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेतील पतीचे नाव कार्सन वस्रा असून तो व्यापारी होता. तर त्याच्या पत्नीचे नाव मंजू आहे. रुग्णालयात उपचार सुरू असताना कार्सन वस्रा यांचा मृत्यू झाला. पत्नीवर वार करीत असताना तिची आई मध्ये आल्यामुळे कार्सन यांनी त्यांच्यावरही हल्ला केला. यामध्ये त्या जखमी झाल्या आहेत.

मंजू यांचे हे दुसरे लग्न होते. आधीच्या नवऱ्याशी त्यांचा घटस्फोट झाला आहे. काही वर्षांपूर्वीच त्यांनी दुसरे लग्न केले होते. विरारमध्ये ते एका इमारतीत दुसऱ्या मजल्यावर राहत होते. काही दिवसांपासून कार्सन मंजू यांच्यावर संशय घेत होता. मंजू यांचे दुसऱ्या पुरुषाशी संबंध असल्याचा त्यांचा संशय होता. यावरून या दोघांमध्ये कायम भांडणे होत होती. 

INDvsSA T-20 : पांड्याचे पुनरागमन धोनी बाहेरच

गुरुवारी सकाळी याच मुद्द्यावरून दोघांमध्ये भांडण सुरू झाले. त्यानंतर संतापलेल्या कार्सन यांनी स्वयंपाक घरातील चाकू घेऊन मंजू यांच्यावर वार केले. त्यांच्या पोटावर आणि इतर ठिकाणी वार करण्यात आले. मंजू यांच्या आईवरही कार्सन यांनी हल्ला केला. गेल्या सहा महिन्यांपासून त्या मंजूसोबतच राहात होत्या. यानंतर त्यांनी स्वतःचा गळा कापून फ्लॅटच्या टेरेसमधून खाली उडी मारली. सर्वांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचार सुरू असतानाच कार्सन यांचा मृत्यू झाला.