पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पूर्णपणे भूयारी मुंबई मेट्रो -३ चे ४५ टक्के काम पूर्ण

मुंबई मेट्रो ३

कुलाबा ते सीप्झ या पूर्णपणे भूयारी मेट्रो मार्गाचे काम मुंबईमध्ये वेगाने सुरू असून, आतापर्यंत ४५ टक्के काम पूर्ण झाले असल्याची माहिती मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने दिली आहे. या भुयारी मार्गामध्ये एकूण ३२ बोगदे असणार आहेत. त्यापैकी ९ बोगद्यांचा मार्ग तयार झाला असून, उर्वरित कामही वेगाने सुरू आहे. टनेल बोअरिंग मशीनच्या साह्याने बोगदे तयार करण्याचे काम सध्या मुंबईमध्ये सुरू आहे. एकूण नऊ मार्गांवरील बोगदे नियोजनाप्रमाणे तयार झाले आहेत.

दक्षिण मुंबई आणि पश्चिम उपनगरांना जोडण्यासाठी मुंबई मेट्रो-३ चा मार्ग उपयुक्त ठरणार आहे. विशेष म्हणजे संपूर्णपणे भुयारी असलेला मुंबईतील हा पहिला मार्ग आहे. यासाठी एकूण २३,१३६ कोटी रुपये खर्च येणार असून, हा मार्ग ३३.५ किलोमीटर इतक्या लांबीचा असेल. या मार्गावरील पहिल्या टप्प्यातील मेट्रो येत्या २०२१ मध्ये सुरू होणे अपेक्षित आहे. आरे ते वांद्रे-कुर्ला संकुल या मार्गावर पहिल्या टप्प्यात मेट्रो सुरू होईल आणि पुढील टप्प्यात वांद्रे-कुर्ला संकुल ते कफ परेड या मार्गावर मेट्रो धावू लागेल.

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने दिलेल्या माहितीनुसार, एकूण ५२ किलोमीटरच्या मार्गापैकी २३.६९ किलोमीटरच्या मार्गावरील बोगदा खणण्याचे काम मार्च अखेर पूर्ण झाले आहे. या कामासाठी कॉर्पोरेशनने एकूण १७ टनेल बोअरिंग मशीन कार्यान्वित केली आहेत. एकूण सात टप्प्यांमध्ये बोगदे तयार करण्याचे काम केले जाणार आहे. ते वेगवेगळ्या पातळीवर सुरू आहे. उदाहरणार्थ पाचव्या टप्प्यांमधील धारावी ते आग्रीपाडा या स्थानकांमधील ७९९२ मीटरपैकी ४७४४ मीटरच्या बोगद्याचे काम आतापर्यंत पूर्ण झाले आहे.