पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बेस्टच्या ताफ्यात ४०० AC बसेस, हे आहेत फायदे...

बेस्ट बस

मुंबईकर प्रवाशांचा बेस्टचा प्रवास अधिक सुखकर आणि जलद करण्यासाठी बेस्टच्या धोरण निश्चिती समितीने ४०० वातानुकूलित लहान बस भाड्याने घेण्याला मंजुरी दिली आहे. विशेष म्हणजे पहिल्या टप्प्यातील १०० ते २०० बसेस पुढच्याच महिन्यात बेस्टच्या सेवेत दाखल होणार आहेत. बेस्टचे महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे यांनी ही माहिती दिली.

ते म्हणाले, येत्या नोव्हेंबर महिन्यापर्यंत भाड्याने घेतलेल्या सर्व ४०० बसेस बेस्टच्या ताफ्यात दाखल झालेल्या असतील. बेस्टच्या ताफ्यातील बसेसची संख्या दहा हजारापर्यंत नेण्याचे नियोजन करण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले. 

कामचुकार सरकारी कर्मचाऱ्यांना आता थेट घरचा रस्ता

गेल्या अनेक वर्षांपासून वाहतूक क्षेत्रातील तज्ज्ञांकडून बेस्टला लहान आणि मध्यम आकाराच्या बसेस ताफ्यात दाखल करून घेण्याचा सल्ला दिला जात होता. मुंबईमध्ये चिंचोळ्या रस्त्यांवरून या बसेस जाऊ शकतात. त्याचबरोबर त्यांचा आकार कमी असल्यामुळे प्रवाशांची जास्त वेळ वाट बघावी लागू शकत नाही. मोठ्या बसच्या तुलनेत या बस प्रवाशांनी लगेचच भरतात आणि त्या प्रवासासाठी रवाना होऊ शकतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

ताफ्यात भाडेतत्त्वावर दाखल होणाऱ्या बसेससाठी केवळ कंडक्टर बेस्टकडून पुरविण्यात येईल. बसचा चालक आणि त्याच्या देखभालीचा खर्च हा बस पुरविणाऱ्या कंत्राटदारालाच करावा लागणार आहे. एकूण दोन कंत्राटदारांकडून प्रत्येकी २०० बसेस भाडेतत्त्वावर घेण्यात येणार आहेत. 

पल्लवी जोशी यांच्या क्रेडिट कार्डची माहिती चोरून १२००० लुटले

धोरण निश्चिती समितीपुढे ठेवण्यात आलेल्या प्रस्तावानुसार, लहान आकारच्या बसेसमध्ये एकूण २१ प्रवासी बसण्याची क्षमता असेल. या बसला एकच दरवाजा असेल आणि त्या सात वर्षांसाठी भाड्याने घेतल्या जातील.