पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ठाण्यात दोन अल्पवयीन मुलांकडून चिमुकलीवर लैंगिक अत्याचार

पुण्यात चिमुरडीवर बलात्कार

ठाण्यामध्ये दोन अल्पवयीन मुलांनी चार वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घोडबंदर रोड येथील कासारवडवली परिसरात ही घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी १२ आणि १६ वर्षांच्या मुलांना अटक केली. त्यांची रवानगी भिवंडी येथील बालसुधारगृहात करण्यात आली आहे. 

CBSE आणि ICSE शाळांमध्ये मराठी बंधनकारक करण्यासाठी कायदा

कासारवडवली परिसरात राहणाऱ्या १२ आणि १६ वर्षांच्या मुलांनी त्याच ठिकाणी राहणाऱ्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केले. चिमुकलीचे वडील मजूरीचे काम करतात तर आई घरकाम करते. ४ फेब्रुवारी रोजी दोघे ही कामावर गेले होते. त्यामुळे चिमुकली घरी एकटीच होती. ती एकटी असल्याचा फायदा घेत दोन्ही मुलं तिच्या घरात गेले आणि त्यांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. 

चीनमध्ये कोरोनामुळे मृत पावलेल्या संख्या १००० पार

चिमुकलीचे आई-वडील कामावरुन घरी आल्यानंतर त्यांना तिच्या अंगावर जखमा झाल्याचे दिसले. त्यांनी आजूबाजूला विचारले असता घरामध्ये दोन मुलं आली असल्याचे शेजाऱ्यांनी सांगितले. चिमुकलीला ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आले तर तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. चिमुकलीवर ठाण्याच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

मुंबईत अल्पवयीन मुलीचा विनयभंग, ७३ वर्षाच्या वयोवृद्धाला

याप्रकरणी कासारवडवली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. दोन्ही मुलं कासारवडवली येथे बांधकाम करणाऱ्या कामगारांची मुलं असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यांनी ताबडतोब दोन्ही मुलांचा शोध घेत त्यांना अटक केली. त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांची रवानगी बालसुधारगृहात केली आहे. 

डोनाल्ड ट्रम्प २४-२५ फेब्रुवारीला भारत दौऱ्यावर