पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

विरारमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळून चिमुकलीचा मृत्यू

विरारमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळला

विरारमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळून एका चार वर्षाच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. विरार पूर्वेला असलेल्या नित्यानंद नगरमध्ये ही घटना घडली आहे. मंगळवारी रात्री अचानक इमारतीच्या गॅलरीचा काही भाग कोसळला. इमारतीच्या खाली खेळत असलेल्या चिमुकलीचा अंगावर स्लॅब कोसळल्याने तिचा मृत्यू झाला. 

२४ तासात पीएमसी बँकेच्या आणखी एका खातेधारकाचा मृत्यू

भूमी विनोद पाटील असं या मृत चिमुकलीचे नाव आहे. भूमी इमारतीच्या खाली खेळत होती. त्यावेळी अचानक इमारतच्या तिसऱ्या मजल्यावर असलेल्या गॅलरीचा काही भाग कोसळला. अग्निशमन दलाला याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तब्बल तीन तासानंतर रात्री १०. ५५ च्या सुमारास ढिगाऱ्याखालून भूमीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.

अनंतनागमध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक 

भूमीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. विरार पोलिसांनी याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. दरम्यान, अग्निशमन दलाच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, 'ही इमारत बेकायदेशीर होती. जवळपास ८० कुटुंब या इमारतीत राहत होती त्यांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने या इमारतीतील वीजपुरवठा खंडित केला आहे.'

अर्थमंत्री स्वतःच्या पतीचं तरी ऐकणार का?, शरद पवार यांचा सवाल