पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सुरत-मुंबई विमान प्रवासात ४ महिन्यांच्या बालिकेचा मृत्यू, कारण अस्पष्ट

स्पाईसजेट विमान (प्रातिनिधिक छायाचित्र)

सुरतहून मुंबईला आलेल्या स्पाईसजेटच्या विमानामध्ये एका चार महिन्यांच्या बालिकेचा अज्ञातपणे मृत्यू झाला. शवविच्छेदन अहवालानंतरही मृत्यूचे कारण स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे या बालिकेच्या शरीरातील पेशींचे नमुने जेजे रुग्णालयात पुढील तपासासाठी पाठविण्यात आले आहेत. रिया जिंदाल असे या बालिकेचे नाव होते.

आता सोनिया गांधी आणि शरद पवारांच्या भेटीकडे महाराष्ट्राचे लक्ष

रिया आपली आई प्रिती आणि आजी-आजोबांसह विमानातून मुंबईला येत होती. विमानातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तिच्या कुटुंबियांनाही तिचा मृत्यू कधी झाला हे कळले नाही. ते जेव्हा मुंबई विमानतळावर उतरले. त्यावेळी रिया प्रतिसाद देत नसल्याने तिला विमानतळावरील वैद्यकीय सेवा कक्षात नेण्यात आले. तिथे प्राथमिक उपचार करण्यात आले. पण त्यालाही तिने प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर तिला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे उपचार करण्यापूर्वीच तिला मृत घोषित करण्यात आले.

या संदर्भात रुग्णालयातील डॉक्टरांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. विमानातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रियाच्या आईने तिला सकाळी साडेपाच वाजता पाजले होते. त्यानंतर ती झोपी गेली. विमानात त्यानंतर तिने कोणतीच हालचाल केली नाही. रिया झोपली असेल, असे वाटल्याने तिच्या कुटुंबियांनी विमानातील कर्मचाऱ्यांना काहीच सांगितले नाही. पण विमान मुंबई विमानतळावर उतरल्यानंतरही रिया कोणताच प्रतिसाद देत नसल्याने तिची आई घाबरली. यानंतर लगेचच कर्मचाऱ्यांना माहिती देण्यात आली. त्यानंतर तातडीने रियाला विमानतळावरील वैद्यकीय उपचार कक्षात नेण्यात आले. 

बलात्कारानंतर मदतीसाठी आलेल्यांनीच पुन्हा तरुणीवर केला बलात्कार

कुपर रुग्णालयात रियाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. पण त्यातही मृत्यूचे नेमके कारण काय हे समजू शकलेले नाही.