पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

रेस्तराँबाहेरचा फोटो इन्स्टाग्रामवर टाकणे तरुणाला पडले महागात... वाच पुढे काय झाले

प्रातिनिधिक छायाचित्र

एका २२ वर्षांच्या युवकाचे अपहरण करून त्याच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी चौघांना अटक केली. सोशल मीडिया ऍपच्या माध्यमातून ओळख झाल्याचे सांगून तिघांनी हे कृत्य केल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी संध्याकाळी ही घटना घडली. कुर्ल्यामध्ये एका रेस्तराँजवळ तक्रारदार तरुण थांबला होता. त्यावेळी दोघे जण दुचाकीवर तिथे आले. त्यांनी तरुणाला आपली इन्स्टाग्रामवर ओळख असल्याचे सांगितले आणि त्याला आपल्यासोबत येण्याची विनंती केली. त्यांचे ऐकून पीडित तरूण दुचाकीवर मध्ये बसला. दुचाकीस्वार विद्याविहारच्या दिशेने निघाला असल्याचे लक्षात आल्यावर तरुणाने त्यांना थांबण्यास सांगितले. पण दुचाकीस्वाराने गाडी न थांबविता ते विद्याविहार स्थानकाजवळ गेले. तिथे त्यांनी पीडित तरुणाला एका कारमध्ये बळजबरीने बसविले. कारमध्ये आधीपासून आणखी एक व्यक्ती होता. 

शिवसेनेशिवाय अशा पद्धतीने भाजपने राज्यसभेत आपले आकडे वाढवले...

तिघांनी मिळून कारमध्ये पीडित व्यक्तीवर लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर त्यांनी कार एका पेट्रोल पंपावर नेली. तिथे पीडित तरुणाच्या क्रेडिट कार्डच्या साह्याने पेट्रोल भरण्यात आले. त्याचबरोबर त्याच्या पाकिटातील २००० रुपयेही हिसकावून घेण्यात आले. 

तरुणाने पोलिसांना फोन करून त्यांच्याकडे मदतीची मागणी केली. पोलिसांनी पीडित तरुणाला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले. मुंबई पोलिसांनी या प्रकरणी भारतीय दंडविधान संहितेच्या कलम ३७७ (जबरदस्तीने समलिंगी संबंध), ३९२ (चोरी), ३२३ (अत्याचार) गुन्हे दाखल केले आहेत. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून दुचाकी आणि कारचा नंबर काढून पोलिसांनी आरोपींना अटक केली. मेहूल परमार, असिफ अली अन्सारी, पियूष चौहान अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. चौथा आरोपी अल्पवयीन आहे. त्यालाही ताब्यात घेण्यात आले आहे.

हैदराबाद एन्काऊंटर: माजी न्यायाधीशांमार्फत होणार चौकशी

पीडित व्यक्तीने रेस्तराँबाहेर सेल्फी काढून संबंधित ठिकाण इन्स्टाग्रामवरील फोटोत लिहिले होते. त्यावरून आम्ही पीडित तरुणाला गाठले, असे आरोपींनी पोलिसांना सांगितले.