पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मुंबई मॅरेथॉनः ६४ वर्षीय स्पर्धकाचा हृदयविकाराने मृत्यू

मुंबई मॅरेथॉनचे हे १७वे पर्व आहे (Aalok Soni/HT)

आशियातील सर्वांत मोठ्या मॅरेथॉन स्पर्धेत एका ज्येष्ठ नागरिक स्पर्धकाचा हृदयविकाराने मृत्यू झाला. गजानन माजलकर (वय ६४) असे मृत्यू पावलेल्या स्पर्धकाचे नाव आहे. चार किमी धावल्यानंतर त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला. त्यात त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यावर उपचार करण्याचे प्रयत्न करण्यात आले. तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, या स्पर्धेत आणखी एका ४० वर्षीय स्पर्धकाला हृदयविकाराचा झटका आला असून त्यांच्यावर बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. एकूण ७ जणांना हृदयविकाराचा झटका आल्याचे 'एएनआय'ने आपल्या वृत्तात म्हटले आहे.

गजानन माजलकर हे मॅरेथॉनच्या ज्येष्ठ नागरिक गटात सहभागी झाले होते. ४ किमी धावल्यानंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना त्वरीत बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आले. तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. ज्येष्ठ नागरिकांची स्पर्धा सकाळी ७.१५ वाजता सुरु झाली होती. 

या मॅरेथॉनमधील आणखी एक स्पर्धक हिमांशू ठक्कर (४०) यांनाही हृदयविकाराचा झटका आला. त्यांना त्वरीत बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान, हृदयविकाराचा झटका आलेल्या आणखी एका स्पर्धकाचे नाव समोर आले आहे. संजय बाफना असे या व्यक्तीचे नाव आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.