पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मुंबईतल्या चार पंचतारांकित हॉटेल्सनां बॉम्बनं उडवण्याची धमकी

प्रातिनिधिक छायाचित्र

मुंबईतल्या चार पंचतारांकित हॉटेल्सनां बॉम्बनं उडवण्याची धमकी आल्यानंतर या हॉटेल्स परिसरातील सुरक्षा अधिक कडक करण्यात आली  आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, जुहू, अंधेरी परिसरातील पंचतारांकित हॉटेल्स आणि मिरारोड परिसरातील एका हॉटेलला धमकीचा इ- मेल आला होता. लष्कर - ए- तोयबाकडून बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी या  हॉटेल्सनां देण्यात आली होती.

चंद्रपूर : भीषण अपघातात ६ ठार, ६ गंभीर जखमी

या प्रकरणी दहशतवादी विरोध पथक आणि गुन्हे शाखा समांतर  चौकशी करत आहेत. मात्र या धमकी निव्वळ अफवा असल्याचं गुन्हे शाखेचं म्हणणं आहे. धमकी प्राप्त झाल्यानंतर तातडीनं बॉम्ब शोधक आणि बॉम्ब नाशक पथक हॉटेल परिसरात तैनात करण्यात आलं आहे. मात्र काहीही हाती लागलं नाही.

जर्मनीमध्ये गोळीबार, ८ जणांचा मृत्यू

काही मुंबई  हॉटेल्सच्या संकेतस्थळावरील कॉमेंट बॉक्समध्ये धमकीचा संदेश दिला होता. या पंचतारांकित हॉटेल्समध्ये मीरारोड परिसरात असलेल्या माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्या पंचतारांकित ‘सेव्हन इलेव्हन स्क्वेअर’ला देखील बॉम्बनं उडवण्याची धमकी देण्यात आली. त्यांच्याकडे १०० बीट कॉईनची खंडणी मागितली होती. 

कमल हासन यांच्या 'इंडियन २'च्या सेटवर अपघात, ३ मृत्युमुखी