पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मुंबईत GST आयुक्तांकडे कोट्यवधींची बेहिशेबी मालमत्ता, CBI कडून चौकशी सुरू

सीबीआय

केंद्रीय वस्तू व सेवा कर विभागाचे (सीजीएसटी) सहायक आयुक्त दीपक पंडीत यांच्यावर बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली. दीपक पंडीत यांच्याकडे चार कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता सापडली आहे. त्यांच्या उत्पन्नाच्या ज्ञान स्रोतांपेक्षा ही मालमत्ता ३७६ टक्क्यांनी जास्त आहे. या प्रकरणी सीबीआयने त्यांची पत्नी आणि दोन मुलांवरही कारवाई केली.

मुंबईच्या पोलिस आयुक्तपदी कोणाची वर्णी?, आज निर्णयाची शक्यता

दीपक पंडीत यांच्या नावावर मुंबईतील जुहू, अंधेरी आणि कांदिवली अशा महत्त्वाच्या ठिकाणी रहिवासी आणि व्यावसायिक स्वरुपाच्या मालमत्ता आहेत. या मालमत्ता घेण्यासाठी पैसा कसा उभारला याचा कोणताही अधिकृत पुरावा त्यांच्याकडे नाही. या प्रकरणी दाखल झालेल्या एका अज्ञात तक्रारीनंतर सीबीआयने ही कारवाई केली. सीबीआयने पंडीत यांची चौकशी सुरू केली आहे. दीपक पंडीत हे आधी सीमा शुल्क विभागात कार्यरत होते. २००० ते २०१४ या काळात सीमा शुल्क विभागात कार्यरत असतानाच त्यांनी ही संपत्ती जमविली असेल, असा सीबीआयच्या अधिकाऱ्यांचा अंदाज आहे.

पुलवामा हल्लाः NIAला मोठे यश, सुसाइड बॉम्बरला मदत करणाऱ्याला अटक

दीपक पंडीत हे सीमा शुल्क विभागात मुंबईमध्ये वेगवेगळ्या पदांवर कार्यरत होते. त्यावेळीच त्यांनी ही माया जमविली असेल, असे सीबीआय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. दीपक पंडीत यांनी स्थावर आणि जंगम या दोन्ही स्वरुपाची मालमत्ता जमविली आहे. त्यापैकी काही मालमत्ता त्यांच्या नावावर तर काही मालमत्ता त्यांची पत्नी आणि मुलांच्या नावावर असल्याचे प्राथमिक तपासात दिसून आले. आरुषी पंडीत असे त्यांच्या पत्नीचे तर आशुतोष आणि दिव्यांश असे त्यांच्या मुलांची नावे आहेत. दीपक पंडीत यांनी आपल्या दोन्ही मुलांच्या लग्नामध्ये मोठा खर्च केला होता, असेही या प्रकरणी अज्ञात तक्रारदाराने म्हटले आहे.