पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

महिलेच्या प्रायव्हेट पार्ट्सला स्पर्श करणाऱ्या व्यक्तीला मुंबईत अटक

नागपूर बलात्कार

एका ३६ वर्षांच्या महिलेचा पाठलाग करून तिचा विनयभंग केल्याच्या प्रकरणात एँटॉप हिल पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली. रविवारीच त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

क्षेपणास्त्रासाठीचे उपकरण घेऊन पाककडे निघालेले जहाज गुजरातजवळ ताब्यात

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वाणासिंग बालकवारासिंग असे आरोपीचे नाव आहे. तो एँटॉप हिलमधील राहणारा असून, सध्या बेरोजगार आहे. पीडित महिलेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात १३ फेब्रुवारीला संध्याकाळी सव्वाआठ वाजता ती आपल्या मुलासोबत बाजारात गेली होती. त्यावेळी गर्दीचा फायदा घेऊन आरोपीने तिचा हात धरण्याचा प्रयत्न केला. तिने दुर्लक्ष केल्यावर आरोपीने गर्दीत तिच्या शरीरावर नको त्या ठिकाणी स्पर्श केला. ती जोरात ओरडल्यावर आरोपी तिथून पळून गेला. पण दुसऱ्या दिवशी ती तिच्या मेहुणीच्या घरी निघाल्यावर आरोपी तिच्या घराखाली उभा होता. हे बघितल्यावर तिने त्या विरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली.

...मग केजरीवालांचे कौतुक करा, अजय माकन यांनी मिलिंद देवरांना फटकारले

एँटॉप हिल पोलिसांनी या प्रकरणी आरोपीविरोधात भारतीय दंडविधान संहितेतील कलम ३५४ (महिलेचा विनयभंग), ३५४ ए (लैंगिक अत्याचार), ३५४ डी (पाठलाग) या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.