पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आईच्या मृत्यूनंतर मुलीवर सातत्याने बलात्कार, बापाला मिळाली कठोर शिक्षा

अटक

मुंबईत आपल्या १४ वर्षांच्या मुलीवर सातत्याने बलात्कार केल्याच्या गुन्ह्यात ३५ वर्षांच्या तिच्या वडिलांना न्यायालयाने १० वर्षांची शिक्षा सुनावली. लैंगिक अत्याचारांपासून मुलांची विशेष सुरक्षा (पॉक्सो) कायद्यांतर्गत न्यायालयाने ही शिक्षा सुनावली. सदर मुलीच्या आईचा २०१४ मध्ये मृत्यू झाल्यानंतर वडील तिच्यावर २०१६ पासून सातत्याने बलात्कार करीत होते.

ठरलं... मध्य रेल्वेची पहिली AC लोकल या मार्गावर धावणार

मुलीने माझ्याविरोधात खोटा गुन्हा दाखल केला असल्याचे वडिलांचे म्हणणे होते. एका घटस्फोटित पुरुषाशी लग्न करायला मी तिला नकार दिल्यानंतर तिने माझ्याविरुद्ध खोटी तक्रार केल्याचे वडिलांचे म्हणणे होते. पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, जुलै ते सप्टेंबर २०१६ या काळात वडील तिच्यावर बलात्कार करीत होते. अखेर सप्टेंबर महिन्याच्या शेवटी तिने आपल्या नातेवाईकांना हा प्रकार सांगितला. त्यानंतर नातेवाईकांच्या मदतीने वडिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

पश्चिम रेल्वेवर लोकलना स्वयंचलित दरवाजे, चाचण्यांना सुरुवात

मुलीचे बाहेर प्रेमप्रकरण सुरू असल्याचा वडिलांचा युक्तिवाद न्यायालयात फेटाळण्यात आला. त्याचे कोणतेही पुरावे वडील सादर करू शकले नाहीत. मुळात वडिलांनी मुलीवर बलात्कार केला हा या खटल्याचा मूळ भाग आहे. मुलीचे इतर कोणाशी संबंध आहेत की नाही, हा खटल्यातील महत्त्वाचा मुद्दा नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले.