पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ऐकावे ते नवलच : मुंबईत २६० शेतकरी, प्रधानमंत्री किसान योजनेचे लाभार्थी

शेतकरी (संग्रहित छायाचित्र)

मुंबईत राहणाऱ्या २६० शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेतून वर्षाला सहा हजार रुपयांची मदत मिळत असल्याची माहिती राज्यातील कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी शोधून काढली आहे. पण मुंबई शहर आणि उपनगरात शेतकरी असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडे नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. काही जणांनी या योजनेच्या लाभधारकांमध्ये आपले नाव फेरपडताळणीविना घातलेले असू शकते, अशी माहिती त्यांनी दिली. आता या शेतकऱ्यांचा शोध जिल्हा प्रशासनाकडून घेतला जातो आहे.

दिल्ली आंदोलन: १८ मेट्रो स्टेशन बंद; ५ तासांनंतर मोबाईल सेवा सुरु

एकूण २६० शेतकऱ्यांपैकी २५६ शेतकरी मुंबई उपनगरात राहणारे आहेत. तर चार शेतकरी लगतच्या भागातील आहेत. लोकसभा निवडणुकीच्या आधी केंद्रातील सरकारने प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजना जाहीर केली. या योजनेनुसार शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये मिळतात. तीन टप्प्यांमध्ये हे पैसे मिळतात. या योजनेसाठी महाराष्ट्रातील १.२० कोटी शेतकरी पात्र ठरू शकतात. पण सध्या ७९ लाख शेतकऱ्यांनीच यासाठी नोंदणी केली आहे.

मुंबई उपनगरात राहणाऱ्या २५६ शेतकऱ्यांपैकी २५१ शेतकऱ्यांना आतापर्यंत वितरित झालेले या योजनेचे सर्व हफ्ते मिळाले आहेत. गावाकडे शेती असणाऱ्या शेतकऱ्यांनी मुंबईत नोंदणी केल्यामुळे त्यांना तिथे या योजनेचे हफ्ते मिळत असतील किंवा या लोकांनी चुकीने योजनेसाठी नोंदणी केलेली असेल, अशी माहिती कृषि विभागाने दिली. 

संजय राऊत यांच्या प्रश्नांचा शरद पवार करणार 'सामना'

ज्या शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी आहे. तेच या योजनेसाठी पात्र आहेत. मुंबईत राहणारे या योजनेच्या लाभधारकांचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असण्याची शक्यता धूसर आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. पडताळणी नीटपणे न करता लाभधारकांची नावे दाखल करण्यात आलेली असू शकतात, असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.