पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पावसाळ्यासाठी पश्चिम रेल्वे सज्ज, २५०० CCTV कॅमेऱ्यांनी सतत लक्ष

पश्चिम रेल्वे पावसाळ्यासाठी विशेष व्यवस्था

पावसाळा अगदी महिन्यावर आला असताना पश्चिम रेल्वेनेही पावसाळ्यात उपनगरीय रेल्वेसेवेत कोणताही अडथळा यायला नको म्हणून जय्यत तयारी केली आहे. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये पश्चिम रेल्वेवरील सर्व उपनगरीय स्थानकांवर २५०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून २४ तास लक्ष ठेवण्यात येणार असून, गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी अधिक मनुष्यबळाची मदत घेण्यात येणार आहे. यासाठी रेल्वे सुरक्षा पोलिस आणि रेल्वे कर्मचाऱ्यांचीही मदत घेतली जाईल. त्याचबरोबर ग्रांट रोड ते लोअर परळ आणि वसई-विरार भागामध्ये रेल्वे रुळांवर पाणी साठण्याचे प्रकार होतात, त्यावरही मार्ग काढण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेकडून ही माहिती देण्यात आली.

पावसाळ्याच्या दिवसामध्ये मुंबईत उपनगरीय रेल्वेसेवा काही तासांसाठी बंद पडण्याचे प्रकार वारंवार होतात. गेल्यावर्षी १० जुलैला नालासोपारा रेल्वे स्थानकाजवळ पाणी साठल्यामुळे तेथील रेल्वेसेवा तब्बल ३० तास बंद पडली होती. त्याचबरोबर सतत मुसळधार पाऊस पडल्यामुळे आणि समुद्रातील उंच लाटांमुळे अनेकवेळा मुंबईत काही ठिकाणी पाणी साठण्याचे प्रकारही वारंवार घडतात. अशावेळी रेल्वे स्थानकांवर मोठी गर्दी होते. त्यामुळे गर्दीचे व्यवस्थापन करण्याचे कामही रेल्वे प्रशासनाला करावे लागते. 

EXCLUSIVE : डेक्कन क्वीनमधील डायनिंग कार बंद होणार

यंदा पावसाळ्याच्या दिवसांमध्ये अंधेरी, दादर, जोगेश्वरी, नालासोपारा आणि विरार या स्थानकांवर रेल्वे प्रशासनाचे जास्त लक्ष असणार आहे. गर्दी टाळण्यासाठी, गाड्यांचा विलंब कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. त्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे, अतिरिक्त रेल्वे सुरक्षा पोलिस, रेल्वे प्रशासनातील कर्मचारी यांची मदत घेतली जाणार आहे. 

पश्चिम रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, मुसळधार पावसाच्या वेळेत रेल्वे स्थानकांवर गर्दी होण्याच्या घटना वाढतात. यावेळी २४ तास यावर लक्ष ठेवण्याचे काम आम्ही करणार आहोत. त्याचबरोबर नियंत्रण कक्षातूनही यावर लक्ष ठेवण्यात येणार आहे. जिथे जास्त गर्दी असेल, तिथे रेल्वे प्रशासनातील कर्मचारी नेमण्यात येतील.

मुंबईत पश्चिम रेल्वेच्या रिकाम्या जागांवर भाजीपाला लावण्यास बंदी

ग्रांट रोड ते लोअर परळ, दादर ते माटुंगा आणि वसई-विरार या भागांमध्ये लोकल चालवताना मोटरमननी जास्त काळजी घ्यावी, असेही निर्देश त्यांना देण्यात आले आहेत, असे या अधिकाऱ्यांनी सांगितले.