पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

लग्नाच्या खरेदीसाठी गेलेल्या डॉक्टर तरुणीचा खड्ड्यांनी घेतला बळी

अपघातात डॉक्टर तरुणीचा मृत्यू

भिवंडीमध्ये खड्ड्यांमुळे एका तरुणीचा बळी गेल्याची घटना समोर आली आहे. वाडा-भिवंडी रोडवर खड्ड्यामुळे डॉक्टर तरुणीचा मृत्यू झाला आहे. घरी जात असताना दुचाकी खड्ड्यात आदळली आणि डॉक्टर तरुणी खाली पडली. पाठी मागून येणाऱ्या ट्रकने तिला चिरडले. बुधवारी रात्री ११ च्या सुमारास ही घटना घडली आहे. या घटनेमुळे भिवंडीमधील खड्ड्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. 

शिवसेनेत धुसफूस कायम, कल्याणमध्ये २६ नगरसेवकांचे राजीनामे

डॉ. नेहा आलमगीर शेख (२३ वर्ष) असं या डॉक्टरचे नाव आहे. नेहा आपल्या भावासोबत दुचाकीवरुन घरी जात होती. दुगाड फाटा येथून जात असताना रस्त्यावर खड्डे होते. दुचाकी खड्ड्यात आदळल्यामुळे मागे बसलेली नेहा खाली पडली. त्याचवेळी पाठीमागून आलेल्या भरधाव ट्रकने नेहाला चिरडले. यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला. 

राज ठाकरे यांनी घेतले कसबा गणपतीचे दर्शन

डॉ. नेहाचे पुढच्या महिन्यात लग्न होते. लग्नाची खरेदी करण्यासाठी ती भावासोबत ठाणे येथे गेली होती. त्याठिकाणावरुन घरी परतत असताना ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे शेख कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. खड्ड्यांमुळे वारंवार अपघात होतात मात्र प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने आणखी एका तरुणीचा नाहक बळी गेला. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी टोलनाका बंद केला. 

बिग बॉस अश्लील कार्यक्रम, तातडीने बंद करण्याची मागणी