पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दोनशे रुपये चोरल्याच्या संशयावरून भावाची हत्या

प्रातिनिधिक छायाचित्र

दोनशे रुपये चोरल्याच्या संशयावरून मोठ्या भावाची  हत्या करण्याचा धक्कादायक प्रकार वांद्रे निर्मलनगर येथे घडला आहे. या प्रकरणी निर्मलनगर पोलिसांनी २२ वर्षीय तरुण शेट्टीला अटक केली आहे. 

नालासोपारा : बॉम्ब तयार करण्याचे प्रशिक्षण देणारा अटकेत

बुधवारी दुपारी ही घटना घडली. रमेशनं पाकिटातून २०० रुपये  चोरल्याचा संशय शेट्टीला आला. यावरुन दोघांमध्ये वाद झाला.  शेट्टीनं रमेशला मारहाण करत  सहा  फूट नाल्यात रमेशला ढकललं. मात्र पोहता येत नसल्यानं रमेशचा नाल्यात बुडून मृत्यू झाला अशी माहिती निर्मलनगर पोलिसांनी दिली. 

अंबानींच्या घराबाहेर तैनात असलेल्या सीआरपीएफ जवानाचा अपघाती मृत्यू

त्यानंतर शेट्टीनं पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्याला मुंबई पोलिसांनी वांद्रे टर्मिनसपरिसरातून अटक केली. तो  शहराबाहेर पळून जाण्याच्या तयारीत होता.