आरे कॉलनीतील २१४१ वृक्ष तोडल्याची माहिती मुंबई मेट्रोने दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे आम्ही पालन करणार असून आता आणखी वृक्ष तोडले जाणार नाही, असे टि्वट मुंबई मेट्रोकडून करण्यात आले आहे.
दि. ४/१०/२०१९ रोजी मुंबई उच्च न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर आम्ही २१८५ वृक्ष तोडण्याचे काम हाती घेतले. दि. ४ आणि ५ ला आम्ही २१४१ वृक्ष तोडले, असे मुंबई मेट्रोने टि्वटमध्ये म्हटले.
We respect the order of the Hon'ble Supreme Court dated October 7, 2019. Following is our official statement. pic.twitter.com/o8CjSmHAB2
— MumbaiMetro3 (@MumbaiMetro3) October 7, 2019
महाराष्ट्र सरकारच्या वतीने उपस्थितीत असलेले विधिज्ञ तुषार मेहता यांनी यापुढे एकही वृक्ष तोडले जाणार नसल्याचे सर्वोच्च न्यायालयासमोर सांगितले. सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणी स्वतः दखल घेत पुढील सुनावणी होईपर्यंत वृक्ष तोडीस प्रतिबंध केला आहे. त्याचबरोबर या वृक्षतोडीविरोधात आंदोलन करत असलेल्या पर्यावरणवाद्यांना त्वरीत मुक्त करण्याचे आदेशही सर्वोच्च न्यायालयाने दिले.
आरेमधील वृक्षतोडीला सुप्रीम कोर्टाची तूर्त स्थगिती
वृक्ष तोडलेली जागा साफ करुन तिथे बांधकाम सुरु केले जाईल, असे मुंबई मेट्रोने स्पष्ट केले आहे. एमएमआरसीएलने आधीच २३८४६ वृक्षांची लागवड केलेली आहे. त्याचबरोबर २५ हजार रोपट्यांचे वितरण करण्यात आले असल्याचे मुंबई मेट्रोने सांगितले.
मुंबई उच्च न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर शुक्रवारी एमएमआरसीने रात्रीपासून वृक्षतोड करण्यास सुरुवात केली होती.