पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

COVID -19: एकट्या मुंबईत १७५३ कोरोनाबाधित, २०४ नव्या रुग्णात भर

कोरोना विषाणूबाधितांच्या संख्येतील वाढ कमी झाली आहे. (संग्रहित छायाचित्र)

मुंबईमध्ये कोरोनाचा विळखा वाढत चालला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या आकड्यात वाढ होत चालली आहे. मंगळवारी मुंबईत आणखी २०४ नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा १७५३ वर पोहचला आहे. तर एका दिवसात ११ जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा १११ वर पोहोचला आहे. 

'कोरोनाविरोधातील लढ्यासाठी आतापर्यंत२१ हजार योद्ध्यांनी दर्शवली तयारी'

महाराष्ट्रात आढळलेल्या कोरोनाबाधित रुग्णांपैंकी सर्वाधिक रुग्ण हे मुंबईचेच आहेत. मुंबईतील रुग्णांच्या आकड्यामध्ये दररोज भर पडत आहे. एका दिवसात २०४ नव्या कोरोनाबधित रुग्णामध्ये भर पडली. मंगळवारी मृत्यू झालेल्या ११ कोरोनाबाधित रुग्णांपैकी ९ जणांना दीर्घकालीन आजार होते. 

वांद्र्यात लॉकडाऊनचे उल्लंघन, घरी जाण्यासाठी मजुरांची स्टेशनवर गर्दी

मुंबईतील प्रतिबंधात्मक परिसरात कोरोना बाधितांचा शोध घेण्यासाठी पालिकेने विशेष क्लिनिक सुरू केले आहेत. आतापर्यंत सुरू केलेल्या ९० क्लिनिक मधून ३५१८ लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करण्यात आले असून त्यापैकी १३८४ संशयितांचे नमुने घेण्यात आले. मुंबईत कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी सरकारकडून सर्वोतपरी प्रयत्न सुरु आहेत. कोरोनाबाधित रुग्ण आढळलेल्या परिसरात निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे.

देशात १० लाख व्यक्तींमागे केवळ १४९ टेस्ट, राहुल गांधींनी केला दावा