पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

नवी मुंबईत शिवसेनेला धक्का; 200 पदाधिकाऱ्यांनी दिले राजीनामे

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नवी मुंबईमध्ये शिवसेनेला धक्का बसला आहे. शिवसेनेच्या 200 पदाधिकाऱ्यांनी अचानक राजीनामे दिले आहेत. एरोली आणि बेलापूर विधानसभा मतदारसंघ भाजपकडे गेल्यामुळे नाराज झालेल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. यामध्ये नवी मुंबईतील शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख, शहरप्रमुख आणि विभाग प्रमुखांचा समावेश आहे. शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या राजीनामा सत्रामुळे शिवसेनेला निवडणुकीत फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

नुसती युती नव्हे महायुती! पण.. फॉर्म्युला अद्यापही गुलदस्त्यातच

नवी मुंबईतील बेलापूर विधानसभा मतदार संघातून भाजप गणेश नाईक यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसैनिक नाराज झाले आहेत. बेलापूर विभागाचे शहरप्रमुख विजय माने यांच्यासह शिवसेना पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. तर दुसरीकडे ऐरोलीमध्ये देखील तिच परिस्थिती पहायला मिळत आहे. ऐरोली मतदारसंघ भाजपकडे जाणार असल्याने नाराज होत शिवसेना पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. 

गुजरातमध्ये भाविकांची बस दरीत कोसळली; २१ जणांचा मृत्यू

दरम्यान, शिवसेना-भाजपमध्ये कोण किती जागा लढवणार याची घोषणा न करता महायुतीची घोषणा सोमवारी करण्यात आली. महायुतीची घोषणा जरी झाली असली तरी कोणती जागा कोण लढवणार याबाबतचा तिढा कायम आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांमध्ये संभ्रमावस्था आहे. शिवसेनेने एबी फॉर्म वाटायला सुध्दा सुरुवात केली. पण, शिवसेनेच्या असलेल्या काही जागा भाजपच्या वाट्याला गेल्यामुळे शिवसैनिक नाराज झाले आहेत. 

धक्कादायक! अल्पवयीन बलात्कार पीडितेने दिला बाळाला जन्म