पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

केईएममधील प्रिन्सची मृत्यूशी झुंज अपयशी

केईएममधील प्रिन्सची मृत्यूशी झुंज अपयशी

केईएम रुग्णालयामध्ये भाजलेल्या व त्यामुळे डावा हात गमावलेल्या दोन महिन्यांच्या प्रिन्स राजभर या बाळाचा मृत्यू झाला आहे.  गुरुवारपासूनच प्रिन्सची प्रकृती अत्यंत नाजूक होती. मध्यरात्री अडीच्या सुमारास प्रिन्सला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यात चिमुकल्याचा  जीव गेला. 

शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी महत्वाची बैठक; आज सरकार स्थापनेचा दावा?

प्रिन्सला हृदयविकारावरील वैद्यकीय उपचारांसाठी मुंबईतील परळ मधील केईएम रुग्णालयात आणले होते. तिथे प्रिन्सला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते.  उपचारादरम्यान ईसीजी यंत्रणेमध्ये बिघाड झाला होता आणि आग लागली त्यामुळे प्रिन्सची डावी बाजू भाजली होती.  ७ नोव्हेंबरला हा प्रकार घडला होता. ११ नोव्हेंबरला प्रिन्सवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. या शस्त्रक्रियेनंतर प्रिन्सला डावा हात गमवाला लागला होता. 

गेल्या दोन आठवड्यापासून प्रिन्सची प्रकृती नाजूक असल्यानं त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मात्र रात्री हृदयविकाराच्या धक्क्याने प्रिन्सची प्राणज्योत मालवली.

सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; ठाकरे-पवार यांच्यात एकतास चर्चा