पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

नाल्यात पडून १९ वर्षीय मुलीचा मृत्यू

प्रातिनिधिक छायाचित्र

अंधेरी येथील आदर्श नगर परिसरातील  नाल्यात पडून १९ वर्षीय कोमल मंडल नावाच्या तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.  कोमल हिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. 

'केंद्राच्या सूडबुद्धीच्या राजकारणामुळे तापस पॉल यांचा मृत्यू'

बचावकार्य  वेळेत सुरु झालं असतं तर नक्कीच कोमलचा जीव वाचला असता अशी भावना तिच्या वडिलांनी व्यक्त केली. 'मंगळवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास कोमल नाल्यात पडल्याचा कॉल मला आला. मी ८.१५ च्या सुमारास घटनास्थळी पोहोचलो. मात्र बचाव कार्याला सुरुवात अर्ध्या तासानंतर झाली', असं कोमलचे  वडील जयराम मंडल म्हणाले. 

अखेर इंदोरीकर महाराजांनी कायदेशीर नोटीसला दिले उत्तर

कोमल घरी परतत असताना हा अपघात घडला. मध्यरात्री कोमलचा शोध घेण्यास बचावपथकाला यश आले, तिला तातडीनं जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तिला डॉक्टरांनी मृत घोषीत केले.