पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मध्य रेल्वे मार्गावर दोन दिवस रात्रकालीन ब्लॉक

मध्य रेल्वे (संग्रहित छायाचित्र)

मध्य रेल्वे मार्गावर १८ ऑक्टोबर ते १९ ऑक्टोबर दरम्यान मध्यरात्री ब्लॉक घेण्यात येणार आहे. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी या आठवड्यात रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे. दिवा ते कल्याण स्थानका दरम्यान हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. डोंबिवली स्थानकावरील कल्याण दिशेकडे असणारा पादचारी पुल पाडण्याचे काम  यावेळी करण्यात येणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिला आहे. 

आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या हर्षवर्धन जाधवांविरोधात गुन्हा दाखल

या ब्लॉकमुळे मध्ये रेल्वे मार्गावरील लोकल मार्गात देखील बदल केले जाणार आहेत. दिवा ते कल्याण दरम्यान अप आणि डाऊन या दोन्ही दिशेकडील जलद मार्गावर लोकल मध्यरात्री १.१० ते पहाटे ३.४० दरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे. कल्याण ते डोंबिवली स्थाकादरम्यान ५ व्या आणि ६ व्या रेल्वे मार्गावर मध्यरात्री. १.१० ते पहाटे ५ वाजेपर्यंत काम करण्यात येणार आहे. 

मतदानाला जाताय मग हे नक्की वाचा

१९ ऑक्टोबर ते २० ऑक्टोबर दरम्यान मध्य रात्री १ ते पहाटे ३. ३० दरम्यान दिवा ते कल्याण दरम्यान सीएसएमटी दिशेकडे जाणाऱ्या धिम्या मार्गावर तर कल्याण दिशेकडील धिम्या मार्गावर रात्री १ ते पहाटे ५ वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक काळात डाऊन धिम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. त्यामुळे रात्री उशिरा २० ते २५ मिनिटं उशिराने लोकल धावणार आहे. तसंच त्यामुळे मध्य रेल्वेच्या कोपर आणि ठाकुर्ली स्थानका दरम्यान लोकल थांबणार नाहीत.  

बंडखोर तृप्ती सावंत यांची शिवसेनेतून हकालपट्टी