पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

१५० महाविद्यालयीन विद्यार्थी १५ हून अधिक भाषांत करणार गांधीवादाचा प्रचार

गांधी जयंती

महात्मा गांधीजींच्या १५० व्या जयंतीनिमित्तानं देशभरात विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. गांधी जयंतीचं औचित्य साधत त्यांच्या अमुल्य विचारांचा ठेवा नव्या पिढीकडे सुपुर्द करण्याचा संकल्प 'विवेक वाणिज्य विद्यालया'चा असणार आहे. 

मुंबईतल्या गोरेगावमध्ये स्थित असलेल्या या महाविद्यालयात गांधी जयंतीनिमित्तानं 'टॉकेथॉन २०१९' चं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमात महाविद्यालयातील १५० विद्यार्थी १५ हून अधिक भाषांमध्ये गांधी विचार मांडणार आहेत. 

दिल्लीत २ कॉन्ट्रॅक्ट किलरना अटक, मुंबईतील व्यावसायिकाने दिली होती सुपारी

गांधींजीच्या १५० व्या जयंतीचं औचित्य साधून यंदाच्या  'टॉकेथॉन २०१९' ची संकल्पना 'मोहन टू महात्मा : वॉक विथ गांधी' अशी ठरवण्यात आली. त्यामुळे या वकृत्त्व कार्यक्रमात विद्यार्थी त्यांना उमगलेले गांधी, गांधीवादाचा प्रचार आणि प्रसार  करणार आहे.

याव्यतिरिक्त महाविद्यालयात छायाचित्रांचं प्रदर्शनही भरवण्यात आलं आहे. या प्रदर्शनाच्या मार्फत गांधींचं  जीवनकार्य, त्यांचं स्वातंत्र्य भारत चळवळीतलं योगदान उलगडलं जाणार आहे. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:150 students will speaking on gandhian ideologies in more than 15 languages 150th birth anniversary of mahatma gandhi