पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पॅरासेलिंगचा दोर तुटून १५ वर्षीय मुलाचा मृत्यू, वडील गंभीर

(प्रतिकात्मक छायाचित्र)

रायगड जिल्ह्यातील मुरुड समुद्रकिनारी पॅरासेलिंग करताना दोर तुटून ५० फुटांवरुन बाप-लेक पडले. यात १५ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला असून वडील गंभीर जखमी आहेत. वेदांत पवार असे मृत मुलाचे नाव आहे. वडील गणेश पवार यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पवार हे पुण्यातील कसबा रोडवरील रहिवासी आहेत. ही घटना शनिवारी घडली. 

एव्हरेस्ट शिखर सर करून परतणाऱ्या अकलूजच्या निहाल बागवानचा मृत्यू

गणेश पवार हे कुटुंबासह शनिवारी सकाळी मुरूड समुद्रकिनारी फिरण्यासाठी आले होते. गणेश आणि वेदांत हे दोघे पॅरासेलिंग करत होते. सकाळी साडेअकराच्या सुमारास पॅरासेलिंग झेपावले. मात्र, काही वेळात पॅरासेलिंगचा दोर तुटला. दोघेही सुमारे ५० फुटांवरून किनाऱ्यावर कोसळले. यात वेदांतचा मृत्यू झाला. वडील गणेश हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना मुरूड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी पॅरासेलिंग चालकावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.