पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मुंबईतील १५ रस्ते बनणार 'नो पार्किंग झोन'

मुंबई अनधिकृत पार्किंग

सार्वजनिक वाहनतळालगत १ किलोमीटर अंतरावर अवैध पार्किंग करणाऱ्यांवर पालिकेकडून १० हजार रुपयांची दंडात्मक कारवाई केली जात आहे. ही कारवाई सुरु असतानाच आता पालिकेने अवैध पार्किंगच्या विरोधात आणखी एक पाऊल उचलण्याचे ठरवले आहे. शहरातील १५ रस्ते नो पार्किंग झोन बनवण्याची पालिकेकडून योजना केली जात आहे. सार्वजनिक वाहनतळाला लोकांनी प्रोत्साहन देण्यासाठी मुंबई महानगर पालिकेकडून हे पाऊल उचलले जात आहे. 

'या' व्हिडिओमुळे हेमा मालिनी सोशल मीडियावर ट्रोल

मुंबईतील २७ वाहनतळांच्या एक किलोमीटर अंतरावर अनधिकृत वाहने उभी केल्यास त्यांच्याविरोधात दंडात्मक कारवाईची मोहिम महापालिकेने मागच्या रविवारपासून सुरु केली. अनधिकृत वाहने उभी करणाऱ्या गाडी मालकाला १० हजार रुपयांची दंडात्मक कारवाई केली जात आहे. दरम्यान, रस्त्यांवरील अनधिकृत वाहनतळांना लगाम घालण्यासाठी महापालिकेने मुंबईतील १५ रस्त्यांची निवड करण्याचा निर्णय घेतला आहे. या रस्त्यांवर प्रायोगिक तत्वावर अनधिकृत वाहने उभी करण्यास बंदी घातली जाणार आहे. दरम्यान, मुंबईमध्ये १४६ सार्वजनिक वाहनतळ आहेत. या वाहनतळामध्ये ३४ हजार ८०८ दुचाकी आणि कार पार्किंगची क्षमता आहे.

भविष्यातील संघर्ष अधिक घातक आणि कल्पनेपलिकडचेः लष्करप्रमुख 

'मुंबई पोलिसांसोबत चर्चा झाल्यानंतर मुंबईतील काही रस्ते नो-पार्किंग झोन म्हणून घोषित करण्यात येतील. मात्र रस्त्यांबाबत अद्याप अंतिम निर्णय घेण्यात आला नाही' अशी माहिती मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त प्रविण परदेशी यांनी दिली आहे. रस्ते आणि ट्राफिक विभागाला पश्चिम आणि पूर्व उपनगरातील प्रत्येकी पाच रस्ते सूचित करण्याचे निर्देश दिले होते. या विभागाने ट्राफिक पोलिसांना ३० रस्त्यांची यादी पाठवली आहे. त्यावरुन ट्राफिक पोलीस अंतिम निर्णय घेणार आहेत. 

'नोटाबंदीच्या पैशातूनच भाजपकडून आमदारांची खरेदी'