पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

धारावीत कोरोनाबाधितांचा आकडा ४३ वर, १५ नव्या रुग्णात वाढ

धारावी

मुंबईतील दाट लोकवस्ती असलेल्या धारावीमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. धारावीमध्ये कोरोनाचे आणखी १५ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे धारावीतील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा ४३ वर पोहचला आहे. कालपर्यंत धारावीतील कोरोनाबाधितांचा आकडा २८ होता. धारावीतील कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता या ठिकाणचे सर्व परिसर सील करण्यात आले आहेत.

ताज हॉटेलच्या ६ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

धारावीमध्ये शनिवारी एका कोरोनाबाधित रुग्णाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. बलिगा नगरमध्ये राहणाऱ्या ८० वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला. त्यामुळे धारावीतील मृतांचा आकडा ४ वर पोहचला आहे. धारावीत कोरोनाबाधितांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. याठिकाणचा कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकार आणि मुंबई महानगरापालिकेकडून सर्वोतपरी प्रयत्न सुरु आहेत. 

राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा १,७६१ वर, १२७ रुग्णांचा मृत्यू

धारावीच्या ज्या भागात कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत तो परिसर आणि त्या इमारती सील करण्यात आल्या आहेत. या कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. तर, इंडियन मेडिकल असोसिएशनचे डॉक्टर आणि स्टाफ धारावीतील घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणी करणार आहे. यासाठी १५० डॉक्टरांची टीम तयार करण्यात आली आहे. तसंच, या परिसरातील नागरिकांनी बाहेर पडू नये यासाठी ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून नजर ठेवली जात आहे.  

कोविड-१९: पाच शहरात ९१ टक्के तर उर्वरित महाराष्ट्रात ९ टक्के रुग्ण