पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

गोवंडीत १२ वर्षाच्या विद्यार्थ्याने केली मुख्याध्यापिकेची हत्या

विद्यार्थ्याने केली शिक्षिकेची हत्या

मुंबईमध्ये एका १२ वर्षाच्या विद्यार्थ्याने शाळेच्या मुख्याध्यापिकेची निर्घृण हत्या केली आहे. गोवंडीतील शिवाजीनगर भागामध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. मित्रांच्यासमोर ओरडल्याचा राग आल्यामुळे या विद्यार्थ्याने हे कृत्य केले आहे. आयेशा अस्लम हुसीये (३० वर्ष) असं हत्या झालेल्या शिक्षिकेचे नाव आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी विद्यार्थ्याला ताब्यात घेतले आहे. त्याची रवानगी डोंगरीच्या बाल सुधार गृहामध्ये करण्यात आली आहे. 

लातूर, अंबाजोगाई शहराचा पाणी पुरवठा १ ऑक्टोबरपासून बंद

आयेशा हुसीये या एका शाळेच्या मुख्याध्यापिका होत्या. गेल्या ५ वर्षापासून त्या राहत्या घरी विद्यार्थ्याना खासगी शिकवणी द्यायच्या. आरोपी विद्यार्थ्याला त्याच्या आईने शिक्षिकेकडून २ हजार रुपये उधार आणण्यासाठी सांगिलले होते. नेहमीप्रमाणे सर्व विद्यार्थी शिकवणीसाठी आयेशा यांच्या घरी आले होते. शिकवणी संपल्यानंतर आरोपी विद्यार्थ्याने शिक्षिका आयेशा यांना आईने पैसे मागितले असल्याचे सांगितले. आयेशा यांनी त्याला पैसे देण्यास नकार दिला आणि सर्व विद्यार्थ्यांसमोर ओरडल्या.

राज्यसेवा परीक्षेतील उत्तीर्ण उमेदवारांच्या नियुक्तीला सुरुवात

आयेशा यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने आणि सर्वांसमोर ओडल्याचा राग या मुलाला आला होता. तो शिकवणी संपल्यानंतर घरी गेला. त्यानंतर तो परत आयेशा यांच्या घरी चाकू घेऊन आला. आयेशा यांच्या अंगावर त्याने चाकूने वार केले. आयेशा यांचा ओरडण्याचा आवाज आल्यानंतर शेजारी राहणारे त्यांच्या घराकडे धावले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आयेशा यांना त्यांनी ताबडतोब रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. 

अफगाणिस्तान बॉम्बस्फोटाने हादरले; ४८ जणांचा मृत्यू