पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सेनेच्या आंदोलनामुळे १० लाख शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळालीःउद्धव ठाकरे

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (शिवसेना टि्वटर)

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा पीक विमा कंपन्यांवर निशाणा साधला आहे. शेतकऱ्यांना पीकविम्याची भरपाई मिळायलाच हवी. शिवसेना यासाठी टोकाला गेल्याशिवाय राहणार नाही. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देणार म्हणजे देणारच, अशी ग्वाही त्यांनी दिली. शिवसेनेने पीक विम्याचा प्रश्न हाती घेतल्यानंतर १० लाख शेतकर्‍यांना ९६० कोटी रूपयांची नुकसानभरपाई मिळाल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच शेतकर्‍यांचा पैसा विमा कंपन्या खात असतील तर त्यांना कडक शासन झालेच पाहिजे, असेही ते म्हणाले.

पीक विम्याची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, पीक विमा योजनेचा शेतकऱ्यांना फायदा होत नाही. जर विमा कंपन्या या योजनेमध्ये काही चालबाजी करत असतील तर हा सरकारने दिलेला शेतकर्‍यांसाठीचा पैसा सरकारने परत घ्यावा आणि शेतकर्‍यांना तो वाटावा. ही योजना केंद्राची आहे आणि या योजनेत ज्या काही त्रुटी आहेत आणि काय सुधारणा पाहिजेत त्या आमच्या खासदारांनी पत्राद्वारे पंतप्रधानांना दिल्या आहेत.

तेल कंपन्यांनी एअर इंडियाचा इंधन पुरवठा रोखला

खरीप २०१८ मोसमासाठी १ कोटी ४४ लाख शेतकर्‍यांनी अर्ज भरले होते त्यात साधारण ५३ लाख शेतकरी पात्र ठरवले गेले आणि ९० लाख शेतकरी अपात्र ठरवले गेले. जर सरकार दुष्काळ जाहीर करते तर तो दुष्काळ या विमा कंपन्यांना कसा दिसला नाही, असा सवाल करत जे शेतकरी चुकीच्या पद्धतीने अपात्र ठरवले गेले आहेत त्यांना सुद्धा पैसे मिळालेच पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. 

पोटावर ११ वार करून महिलनं केला पतीचा खून
शिवसेनेने पीक विम्याचा प्रश्न हाती घेतल्यानंतर १० लाख शेतकर्‍यांना ९६० कोटी रूपयांची नुकसानभरपाई मिळाली. ९० लाख शेतकरी जे अपात्र ठरवले गेले त्यांच्यासाठी तरतूद असलेली २ हजार कोटी रुपयांची रक्कम पीक विमा कंपन्यांकडे नफा म्हणुन जमा झाली आहे. शेतकर्‍यांचा पैसा विमा कंपन्या खात असतील तर त्यांना कडक शासन झालच पाहिजे.