मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Vrial video : चेन्नईच्या रस्त्यावर दिसला शर्टलेस 'झॉम्बी', अनेकांना घेतला चावा; व्हिडिओ व्हायरल

Vrial video : चेन्नईच्या रस्त्यावर दिसला शर्टलेस 'झॉम्बी', अनेकांना घेतला चावा; व्हिडिओ व्हायरल

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Apr 05, 2024 11:42 AM IST

chennai viral video : चेन्नई येथे दोन मद्यधुंद परदेशी नागरिकांनी रस्त्यावर चांगलाच गोंधळ घातला. रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना दोघेही चावत सुटले. यामुळे नागरिक घाबरून पळत सुटले होते. पोलिसांनी आणि काही स्थानिकांनी मिळून दोघांनाही पकडून त्यांना अटक केली आहे.

चेन्नईच्या रस्त्यावर दिसला शर्टलेस 'झॉम्बी', अनेकांना घेतला चावा; व्हिडिओ व्हायरल
चेन्नईच्या रस्त्यावर दिसला शर्टलेस 'झॉम्बी', अनेकांना घेतला चावा; व्हिडिओ व्हायरल

chennai viral video : चेन्नईमध्ये एक धक्कादायक घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. एक मद्यधुंद आणि शर्ट नसलेल्या दोन परदेशी नागरिकांनी रस्त्यावर चांगलाच गोंधळ घातला. रस्त्यावरून जाणाऱ्या अनेक नागरिकांना या दोघांनी चावे घेतले. यामुळे काही नागरिक जखमी झाले आहे. तसेच या प्रकारामुळे रस्त्यावर चांगलाच गोंधळ निर्माण झाला होता. स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी रस्त्यावर नागरिकांना चावणाऱ्या आणि गोंधळ घालणाऱ्या या दोन परदेशी नागरिकांना पकडून त्यांना चांगलाच चोप दिला. चेन्नईच्या रोयापेट्टा भागात ही घटना घडली असून याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओत हे परदेशी नागरिक रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना चावे घेतांना दिसत आहे. एकाने तर एका दुचकीस्वाराच्या आंगवर जाऊन त्याच्या मानेवर चावा घेतला.

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai High court : विद्यार्थ्याला १२ वीची गुणपत्रिका देण्यास मुंबई बोर्डाचा नकार; कोर्टाने दिला आदेश

चेन्नई येथे रोयापेट्टा भागात दोन दिवसांपूर्वी ही घटना घडली. युरोपातील एका देशाच्या नौदलाचे हे कर्मचारी होते. ते चेन्नई येथे फिरण्यासाठी आले होते. दरम्यान, त्यांनी अतिमद्य प्राशन केले होते. यानंतर दोघांनीही या अवस्थेत मोठा गोंधळ घातला. दोघांनीही रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांवर हल्ले केले. त्यांना चावे घेण्यास सुरुवात केली. या घटनेमुळे एकच गोंधळ उडाला. या दोघांपासून वाचन्यासाठी नागरिक सैरावैरा पळू लागले होते. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. दोघांपैकी एकाने अंगावर शर्ट देखील घातला नव्हता.

NCERT ने अभ्यासक्रमात केला मोठा बदल! बाबरी मशीद विध्वंस प्रकरण हटवले; आता पुस्तकात राम मंदिर उभारणीचा धडा

हा मद्यधुंद परदेशी व्यक्ति रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्यांच्या अंगावर हल्ला करून त्यांना चावा घेत होता. अखेर ही घटना पोलिसांना कळवण्यात आली. पोलिसांनी या दोघांना अटक करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी पोलिसांवर देखील हल्ला चढवला. अखेर स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी या परदेशी नागरिकांना पकडून चांगलाच चोप दिला. यानंतर दोघांनाही अटक करण्यात आली. दोघांचा हा गोंधळ घालत असतांनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या व्हिडिओवर अनेक नेटकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही लोकांनी परदेशी नागरिकाची तुलना झोम्बीशी केली आहे. सार्वजनिक ठिकाणी दारू व इतर मादक पदार्थांची विक्री व सेवन बंद करण्याची मागणी काही लोकांनी केली आहे.

CBSE Exam pattern : मोठी बातमी! सीबीएसईने ११ वी, १२वीच्या परीक्षेत केले मोठे बदल, वाचा तपशील

"ही लाजिरवाणी झोम्बी घटना चेन्नईमध्ये घडली. एक परदेशी नागरिक मद्यधुंद अवस्थेत प्रवाशांना चावण्याचा प्रयत्न करत होता," असे एका व्यक्तीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले. दुसऱ्या यूजरने लिहिले की, "त्याला हातकड्या लावून का नेले जाऊ शकत नाही? चेन्नई पोलीस, अशांना चांगला चोप का देत नाही असे एका यूझर्सने म्हटले आहे.

 

एकाने लिहिले की, "जर एखाद्या भारतीयाने लंडन किंवा न्यूयॉर्कमध्ये हे केले असते, तर भारतीयांना टार्गेट करण्यात आले असते. त्यामुळे आता भारतात सुद्धा पर्यटक आणि व्हिसासाठी कठोर कायदे करण्याची मागणी या व्यक्तीने केली आहे.

IPL_Entry_Point

विभाग