5G Ambulance Service: मुंबईत सुरु झाली 5G अॅम्बुलन्स सेवा, झेन्झोचा उपक्रम
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  5G Ambulance Service: मुंबईत सुरु झाली 5G अॅम्बुलन्स सेवा, झेन्झोचा उपक्रम

5G Ambulance Service: मुंबईत सुरु झाली 5G अॅम्बुलन्स सेवा, झेन्झोचा उपक्रम

Published Aug 19, 2023 06:50 PM IST

5G Ambulance Service: हेल्थकेअर कंपनी झेन्झोने मुंबईत नुकतेच 5G अॅम्बुलन्स सेवा सुरु केली. ही अॅम्बुलन्स अत्यंत प्रगत अशा उपकरणांनी सज्ज असून त्यात उच्च दर्जाची कम्युनिकेशन क्षमता आहे.

5G अॅम्बुलन्स सेवा
5G अॅम्बुलन्स सेवा

5G Ambulance Service in Mumbai: हेल्थ केअर कंपनी झेन्झोने आपली पहिली वहिली आणि अनोखी 5G अॅम्बुलन्स सेवा १८ ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये सुरु केली आहे. झेन्झोची आधुनिक 5G अॅम्बुलन्स ही अत्यंत प्रगत अशा उपकरणांनी सज्ज असून त्यात उच्च दर्जाची कम्युनिकेशन क्षमता आहे, ज्यामुळे आपत्कालीन वैद्यकीय सहाय्यतेचा वेग आणि अचुकता सुधारणार आहे. ज्याचा थेट फायदा रुग्णाला होणार असून गंभीर परिस्थितीमध्ये रुग्णसेवा करण्याची एकूण कार्यक्षमता देखील वाढणार आहे. महाराष्ट्र विधानसभेचे सभापती भाजपा नेते अॅड. राहुल नार्वेकर यांनी या अभिनव उपक्रमाचे स्वागत आणि कौतुक केले.

झेन्झो अॅम्बुलन्स सेवा सुरू करण्याची घोषणा करताना झेन्झोचे संस्थापक शफी माथेर यांनी या सेवेविषयी माहिती दिली. या अॅम्बुलन्सद्वारे बसल्या जागी हेल्थ डेटा मिळवता येईल आणि शेअर करता येईल. रुग्णाची अजून उत्तम पद्धतीने देखभाल करणे सोपे होईल आणि उपचार अधिक जलद गतीने होतील. व्हेंटिलेटर, डिफिब्रिलेटर, मल्टीपॅरा पेशंट मॉनिटर्स, ईसीजी मशीन आणि सिरिंज पंप यांसारख्या जीव वाचवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या प्रमुख मशीन्स यात असल्याचे त्यांनी सांगितले. झेन्झोच्या डायरेक्टर श्वेता मंगल यांनी नागरिकांना ही सेवा जलद आणि सहज मिळावी म्हणून झेन्झो अॅप सुद्धा तयार असल्याचे सांगितले. तसेच याला ‘वन स्टॉप मेडिकल कॉन्सर्ज’ बनवण्याचे आमचे ध्येय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

 

आधुनिक 5G अॅम्बुलन्स सेवेची वैशिष्ट्ये

- रुग्णांच्या स्थितीवर सतत लक्ष ठेवणे

- वैद्यकीय तज्ज्ञांसह व्हिडियो-कॉन्फरन्सिंगद्वारे थेट संपर्क

- विविध वैद्यकीय जाणकारांची अनेक गोष्टींवर मते मागवली जातात. - अॅम्बुलन्स मध्ये असतानाच उपचार सुरु होतील.

- गंभीर स्थितीत असलेल्या रुग्णाचा गोल्डन अवर म्हणजे जिवंत ठेवण्याचा कालावधी वाढवणे.

- प्री-अरायव्हल इमर्जन्सी रूम सपोर्ट आहे. हॉस्पिटलला पोहोचण्या आधीच हॉस्पिटलला कळवून आगाऊ वैद्यकीय तयारी केली जाते.

 

झेन्झो अॅप वापरण्याचे अन्य फायदे

- बेसिक, कार्डियाक, एअर, ट्रेन आणि इतर प्रकारच्या अॅम्बुलन्स सेवेसाठी बुकिंग

- रिअल-टाइम अॅम्बुलन्स ट्रॅकिंग

- रिमोट मेडिकल सपोर्ट टीमची मदत

- अलर्ट आणि अपडेट नोटीफिकेशन

- सुरक्षित ओटीपी कन्फर्मेशन

- परिसरातील मेडिकल सेवा ठिकाणे

- प्रोफाइल मॅनेजमेंट

- कुटुंबातील सदस्य जोडणे

- वैयक्तिक माहितीसह सहज बुकिंग

 

झेन्झोच्या इतर अॅम्बुलन्स सेवा

झेन्झो द्वारे प्रदान केल्या जाणाऱ्या अन्य अॅम्बुलन्स सेवांमध्ये अॅम्बुलन्स सबस्क्रिप्शन, ऑन-साइट अॅम्बुलन्स, इव्हेंट अॅम्बुलन्स, एयर अॅम्बुलन्स, मेडिकल रूम्स, कॉर्पोरेट वेलनेस प्रोग्राम आणि मोबाईल मेडिकल व्हॅन यांचा समावेश आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर