Sharmila Pawar allegations on Ajit Pawar group : बारामती विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार युगेंद्र पवार यांच्या आई शर्मिला पवार यांनी गंभीर आरोप केले आहे. कार्यकर्त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली जात असून दमदाटी करण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं आहे. या सोबतच मतदारांना घड्याळाचे शिक्के असलेल्या स्लीप वाटल्या जात असल्याच देखील त्यांनी म्हटलं आहे. या प्रकरणी निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार करणार असल्याचं पवार म्हणाल्या.
राज्यासह सर्व देशाचे लक्ष लागून असलेल्या बारामतीमध्ये अनेक नाट्ययमी घडामोडी पाहायला मिळत आहे. या ठिकाणी बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख अजित पवार व त्यांचे पुतणे विरुद्ध युगेंद्र पवार असा सामना आहे. बारामती मतदारसंघात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरु असताना या ठिकाणी अजित पवार गट आणि शरद पवार गट यांच्यात राडा झाला आहे. उमेदवार युगेंद्र पवार यांच्या आई शर्मिला पवार यांनी अजित पवार गटावर मतदारांना दमदाटी केल्याचा आरोप केला आहे. शर्मिला पवार म्हणाल्या, “ काही मतदारांना माझ्यासमोर दमदाटी करण्यात आली. दमदाटी करणारी व्यक्ति माझ्यासमोर उभी होती. ती व्यक्ति मतदान केंद्राच्या आत स्वत:च्या घरातलं लग्न कार्य असल्यासारखं वावरत येणाऱ्या मतदारांना खाण खुणा केल्या करत असल्याचं शर्मिला पवार यांनी म्हटलं आहे.
शर्मिला पवार म्हणाल्या, ती व्यक्ति नेमके काय संकेत देत होती माहित नाही. मात्र, या बाबीला आम्ही आक्षेप घेतला. त्या व्यक्तीला तुम्ही मतदान केंद्रात या प्रकारचे वागू शकत नाही. ही सर्व चुकीचं आहे असं सूनवलं. यावेळी आमच्या सोबत असलेले मोहसीन हे देखील त्या व्यक्तीला तेच सांगत होते. मात्र, त्यांना धमकावण्यात आलं. यानंतर आम्ही त्याची तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी त्याला बाहेर काढलं. आम्हाला पोलीस सहकार्य करतायत. दरम्यान, मी आता बाहेर आले. मी आत जात असून गेटच्या बाहेर आहे. दरम्यान, बाहेर काढलेल्या व्यक्तीचा मोठा भाऊ आत गेला. त्याने मोहसीनला आतमध्ये जाऊन तुला बघून घेईन अशी धमकी दिली, असे शर्मिला पवार म्हणाल्या.
दरम्यान हे कार्यकर्ते कुणाचे होते ते अजित पवार यांचे कार्यकर्ते होते का असे विचारले असता शर्मिला पवार म्हणाल्या. मला माहिती नाही ते कोणाचे कार्यकर्ते होते, पण ते घडयाळाचे कार्यकर्ते होते एवढं सांगू शकते. या प्रकरणी निवडणूक आयोगाला लेखी तक्रार दिली आहे. या ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज देखील आहे, मात्र, ते डिलीट केले जाण्याची भीती आहे. दरम्यान, या ठिकाणी बोगस मतदान होत आहे का असे त्यांना विचारले असता यावर मी काही बोलू शकत नाही असे शर्मिला पवार म्हणाल्या. या प्रकरणी निवंडूक आयोगाने योग्य ती कारवाई करण्याची मागणी देखील शर्मिला पवार यांनी केली आहे.