Viral News : प्रसिद्ध यूट्यूबर आणि पॉडकास्ट होस्ट रणवीर अलाहाबादिया हा थोडक्यात बचवला आहे. या बाबत त्याने स्वत: माहिती दिली आहे. तो त्याच्या प्रेयसीसोबत गोव्यात फिरायला गेला होता. यावेळी समुद्रात पोहण्याचा आनंद घेत असतांना अचानक त्याला धाप लागल्याने तो बुडू लागला. ही घटना एका आयपीएस अधिकारी व त्यांच्या आयआरएस पत्नीने पहिली. त्या दोघांनी त्यातडीने त्यांना पाण्यातून बाहेर काढत बुडण्यापासून वाचवले. रणवीरने हा प्रसंग २५ डिसेंबर रोजी इन्स्टाग्राम पोस्टकरत कथन केला आहे. त्याची ही पोस्ट व्हायरल झाली आहे. यावर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देखील दिली आहे.
रणवीरने त्याचा अनुभव कथन करतांना सांगितले की, तो गोव्यात फिरण्यासाठी गेला होता. यावेळी तो त्याच्या गर्लफ्रेंडसोबत समुद्रात पोहत असतांना एका मोठ्या लाटेने त्यांना समुद्रात ओढले. यामुळे त्यांना बाहेर पडने शक्य झाले नाही, ते बुडत असतांना एका आयपीएस अधिकाऱ्याने आम्हाला पाहिले व त्याने आम्हाला पाण्यातून बाहेर काढले. सध्या आम्ही पूर्णपणे ठीक असल्याचे रणवीरने पोस्टमध्ये म्हटले आहे.
रणवीरम्हणाला की, त्याला लहानपणापासूनच खुल्या समुद्रात पोहण्याचा छंद आहे. २४ डिसेंबर रोजी गोव्यात समुद्रात पोहत असताना तो आणि त्याची प्रेयसी एका मोठ्या लाटेत अडकून पडले आणि ते खोल समुद्रात जाऊ लागले. पाण्याचा प्रवाह जोरदार होता. त्याने अनेक प्रयत्न करून पाच ते दहा मिनिटे पोहण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला धाप लागल्याने तो बेशुद्ध पडला. यावेळी त्याकह्या प्रेयसीने मदतीसाठी हाक मारली.
रणवीरने इन्स्टाग्रामवर लिहिले की, "तो एक आनंदाचा क्षण असला तरी तो जिवावर बेतला होता. आम्ही आमचा जीव वाचवण्यासाठी धडपड करत होता. मात्र, नाका तोंडात पाणी गेल्याने माझी शुद्ध हरपू लागली होती. तेवढ्यात त्याने व त्याकह्या प्रेयसीने मदतीसाठी आरडाओरडा केला. मी नशीबवान होतो. जवळच एक जोडपं पोहत होतं, त्यांनी आम्हाला पाहिले व लगेच पाण्याबाहेर काढले. त्या आयपीएस अधिकारी आणि त्यांच्या आयआरएस पत्नीच्या कुटुंबियांचा मी मनापासून आभारी आहे, ज्यांनी आम्हाला वाचवले.
रणवीरने आपल्या गर्लफ्रेंडचे नाव जाहीर केले नाही. या पोस्टमध्येही त्याने तिचा चेहऱ्या लवपला आहे. तसेच तिचा कोणताही फोटो शेअर केला नाही.
संबंधित बातम्या