राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे जोरदार वाहत आहेत. प्रचारासाठी केवळ तीन ते चार दिवस राहिल्याने प्रत्येक पक्ष व उमेदवार मतदारांपर्यंत पोहोचण्याचा त्याला आपली भूमिका समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. सध्याच्या काळात प्रचारासाठी सभांबरोबरच समाज माध्यमांचाही मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. त्यातच आता प्रसिद्ध युट्युबर ध्रुव राठी याने एक व्हिडीओ त्याने नुकताच प्रसिद्ध केला. ज्याची चर्चा महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात होत आहे. ध्रुव राठीने (dhruv rathi) याआधीही महाराष्ट्र आणि भारतीय राजकीय परिस्थितीवर आपल्या व्हिडीओ बनवले आहेत.
ध्रुव राठी हा प्रसिद्ध युट्युबर असून त्यांचे युट्युबवर अडीच कोटी फॉलोवर्स आहेत. राठी याने ‘मिशन स्वराज’ नावाने एक व्हिडिओ जारी करत महाराष्ट्रातील नेत्यांना खुलं आव्हान दिलं आहे. जो कोणी हे आव्हान स्वीकारेल आणि पूर्ण करून दाखवेल,त्याच्यासाठी मी काम करेन. मात्र,जर हे आव्हान स्वीकारलं आणि पूर्ण करून दाखवलं नाही तर त्याची माझ्यासह माझ्या २.५ कोटी सहकाऱ्यांशी गाठ आहे. ध्रुव राठीचे हे आव्हान शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी हे आव्हान स्वीकारलं आहे. महाविकास आघाडी सत्तेत आल्यावर आम्ही हे पूर्ण करून दाखवू,असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.
ध्रुव राठीने आपल्या यूट्यूब चॅनेलवर साधारण दोन मिनिटांचा एक शॉर्ट व्हिडीओ अपलोड केला आहे. या व्हिडीओत राठी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वप्नातला महाराष्ट्र घडवण्यासाठी नेत्यांनी प्रयत्न करायला हवेत,असं म्हटलंय. यासह ध्रुव राठीने राज्यात कोणकोणत्या क्षेत्रात विकास व्हायला हवा,हेही सांगितलंय. त्यासाठी, त्याने८आव्हानं दिली असून जो नेता हे आश्वासन पूर्ण करेल,त्यांचा प्रचार करणार असल्याचंही राठी यांनी म्हटलं आहे. आदित्य ठाकरे यांनी त्यांचं आव्हान स्वीकारलं असून रोहित पवार यांनीही ट्विट करुन दुजोरा दिला आहे.
मविआ म्हणून याच उद्दिष्टांच्या दिशेने आम्ही काम करत होतो. हे काम आत्ताच्या सत्ताधार्यांनी कपटाने थांबवले. हे आव्हान स्वीकारण्यासारखे आहे म्हणून आम्ही त्याला स्वीकारले नाही. तर या आव्हानामध्ये जे सांगण्यात आले आहे,तेच आम्हाला करायचे आहे.चला महाराष्ट्र हे पण करून दाखवुया, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.