मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Buldhana: देशासाठी लढण्याचं स्वप्न अधुरचं राहिलं; सैन्य भरतीची तयारी करणाऱ्या तरुणावर काळाचा घाला

Buldhana: देशासाठी लढण्याचं स्वप्न अधुरचं राहिलं; सैन्य भरतीची तयारी करणाऱ्या तरुणावर काळाचा घाला

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Sep 22, 2023 12:05 AM IST

Buldhana Shocking: बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात गणेश चतुर्थीच्या दिवशी ही घटना घडली.

Buldhana
Buldhana (Pixabay)

Buldhana News: बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात सैन्य भरतीची तयारी करणाऱ्या १९ वर्षीय तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. गावातील तरुण मुलाचा अकस्मित मृत्यू झाल्याने संपूर्ण गावांमध्ये शोककळा पसरली. संबंधित तरुण भरतीसाठीची सर्व पूर्व तयारी करण्यासाठी दररोज सकाळी उठायचा. परंतु, मंगळवारी (१९ सप्टेंबर) तो नेहमीप्रमाणे नित्यक्रम व्यायाम करून घरी परतला. त्यानंतर चहा पाणी घेत असताना अचानक जमीनीवर कोसळला.

ट्रेंडिंग न्यूज

गणेश विष्णू लोणकर (वय, १९) असे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालेल्या तरुणाचे नाव आहे. गणेश हा संग्रामपूर तालुक्यातील टुनकी गावातील रहिवाशी असून सैन्यात भरती होऊन देशाची सेवा करण्याची त्याची इच्छा होती. यासाठी तो दररोज सकाळी लवकर उठून व्यायाम करायचा. यात धावण्याचा समावेश आहे. दरम्यान, मंगळवारी तो नेहमीप्रमाणे सकाळी उठून व्यायाम करायला गेला. व्यायाम करून घरी परतल्यानंतर गणेश पाणी प्यायला. यानंतर तो जमीनीवर कोसळला. गणेशला त्वरीत जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केली.

गणेशच्या मोठ्या भावचे तीन वर्षांपूर्वी विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला होता. गणेशचे वडील ड्रायव्हर काम करून शेती करायचे. यामुळे वडिलांचे कुठेतरी कष्ट थांबवावे, यासाठी गणेश दिवसरात्र मेहनत घेत होता. मात्र, काळाने घाला घातल्याने सैन्यात भरती होण्याची त्याचे स्वप्न अधुरेच राहिले. गणेशच्या मृत्युने गावात शोककळा पसरली.

WhatsApp channel