मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Kannad Murder Case: कन्नडमध्ये सैराटची पुनरावृत्ती; प्रेमसंबंधातून तरुणाची भरदिवसा हत्या,आरोपीला अटक

Kannad Murder Case: कन्नडमध्ये सैराटची पुनरावृत्ती; प्रेमसंबंधातून तरुणाची भरदिवसा हत्या,आरोपीला अटक

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Oct 01, 2022 03:32 PM IST

Kannad Aurangabad Murder Case : बहिणीसोबत विशालचं प्रेमसंबंध असल्याचा संशय आरोपी कृष्णाला होता. त्यामुळं सूडानं पेटलेल्या कृष्णानं विशालला भेटण्यासाठी बोलावलं आणि त्याच्यावर लाकडी दांड्यानं हल्ला चढवला.

Kannad Aurangabad Crime News Marathi Today
Kannad Aurangabad Crime News Marathi Today (HT)

Kannad Aurangabad Crime News Marathi Today : काही महिन्यांपूर्वी आंतरजातीय विवाह केला म्हणून औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूरमधील लाडगांवमध्ये एका तरुणाची मुंडकं छाटून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर आता बहिणीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात एका तरुणाची भरदिवसा हत्या करण्यात आल्यानं खळबळ उडाली आहे. विशाल लव्हाळे असं मृत तरुणाचं नाव असून या प्रकरणात पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातल्या टापरगावात बहिणीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून आरोपी कृष्णा दिगंबर पवार यानं एका युवकाच्या डोक्यात लाकडी दांडा टाकून त्याला मारहाण केली होती. त्यानंतर मारहाण होत असताना विशालनं घटनास्थळावरून पळ काढला, तो घरी आल्यानंतर त्याच्या डोक्याला गंभीर मार लागलेला होता. याशिवाय शरीरावर रक्ताचे डाग असल्यानं त्याचे कुटुंबीय प्रचंड घाबरलेले होते. तितक्यात विशालला चक्कर आले आणि तो खाली पडला. त्यानंतर त्याला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु तोपर्यंत त्याचा मृत्यू झालेला होता.

बहिणीसोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय आल्यानं आरोपी कृष्णानं विशालला फोन करून भेटण्यासाठी बोलावलं. त्यानंतर दोघं भेटले, त्यांच्यात काही वेळ चर्चाही झाली. परंतु त्यानंतर कृष्णानं अचानक विशालच्या डोक्यात अणकुचीदार लाकडी दांड्यानं मारहाण करायला सुरुवात केली. विशालला सोडवण्यासाठी आलेल्या गणेश औटे आणि उमेश मोरेलाही कृष्णानं मारहाण केली.

त्यानंतर आता या प्रकरणात विशालच्या वडिलांनी आरोपी कृष्णाविरोधात कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी कृष्णाविरोधात कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

WhatsApp channel