Dombivli News : इन्स्टाग्राम रील बनवता-बनवता तरुणाची खाडीत उडी, डोंबिवलीतील घटना-youth jumps into creek while creating instagram reel ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Dombivli News : इन्स्टाग्राम रील बनवता-बनवता तरुणाची खाडीत उडी, डोंबिवलीतील घटना

Dombivli News : इन्स्टाग्राम रील बनवता-बनवता तरुणाची खाडीत उडी, डोंबिवलीतील घटना

Feb 24, 2024 11:39 AM IST

Youth jumps into creek: इन्स्टाग्राम रील बनवताना एका २५ वर्षीय तरुणाने डोंबिवली पश्चिमेकडील माणकोली पुलाजवळील खाडीत उडी मारली.

vishnu nagar police station dombivli west
vishnu nagar police station dombivli west

Dombivli News: इन्स्टाग्राम रील बनवताना एका २५ वर्षीय तरुणाने डोंबिवली पश्चिमेकडील माणकोली पुलाजवळील खाडीत उडी मारली. या घटनेची माहिती मिळताच विष्णूनगर पोलिस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी शोधमोहीम सुरू केली. ही घटना शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडली. 

रोहित अशोक मोरया (वय, २५) असे खाडीत उडी मारलेल्या तरुणाचे नाव आहे. रोहित हा भिवंडीतील साईनगर येथील गायत्री मंदिरासमोरील कामतघर येथे वास्तव्यास आहे. रोहित हा शुक्रवारी दुपारी मित्रासोबत रील पकडण्यासाठी माणकोली पुलावर गेला. मित्रासोबत एक रील तयार केल्यानंतर दुसऱ्या रीलवर काम करत असताना त्याने अचानक पुलावरून खाडीत उडी मारली.

विष्णूनगर पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, एका ग्रामस्थाकडून माहिती मिळताच आम्ही अग्निशमन दलासह घटनास्थळी पोहोचलो आणि खाडीत तरुणाचा शोध सुरू केला. दुर्दैवाने, शुक्रवारी सायंकाळपर्यंत त्याचा ठावठिकाणा मिळाला नाही. यामुळे आजही त्याचा शोध घेतला जात आहे.

प्रेमाला विरोध केल्याने मुलीची आत्महत्या

प्रेमप्रकरणाला होणाऱ्या विरोधाला कंटाळून एका तरुणीने गळफास लावून आत्महत्या केली. मात्र, या घटनेने समाजात बदनामी होईल, या भीतीने कुटूंबाने मुलीचा मृतदेह घरातच लपवून ठेवला. दोन दिवसानंतर मृतदेहाची दुर्गंधी येऊ लागल्याने मृतदेह गोणीत भरून जवळच्या विहिरीत टाकून दिला.हा प्रकार समोर येताच मृत तरुणीच्या वडिलांना अटक केली आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील फतेहपूर येथे घडली.

Whats_app_banner
विभाग