मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Thane Crime News : विदेशात नोकरीचं आमिष दाखवून तरुणाची फसवणूक; धक्कादायक घटनेनं ठाण्यात खळबळ

Thane Crime News : विदेशात नोकरीचं आमिष दाखवून तरुणाची फसवणूक; धक्कादायक घटनेनं ठाण्यात खळबळ

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Jan 14, 2023 01:03 PM IST

Thane Crime News : एका खाजगी संस्थेनं तरुणाला विदेशात क्रेन ऑपरेटरची नोकरी देण्याचं आमिष दाखवून आर्थिक फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे.

Thane Crime News Marathi
Thane Crime News Marathi (HT_PRINT)

Thane Crime News Marathi : विदेशात नोकरी मिळवून देण्याचं आमिष दाखवून ठाण्यातील तरुणाची आर्थिक फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरोपींनी तरुणाला क्रेन ऑपरेटरची नोकरी आणि त्यातून गलेलठ्ठ पगाराचं आश्वासन देत ९५ हजार रुपयांची फसवणूक केली आहे. त्यामुळं आता तरुणानं तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गु्न्हा दाखल केला असून त्यांच्या अटकेसाठी कार्यवाही सुरू केली आहे. त्यामुळं आता या घटनेमुळं ठाण्यात तरुणांची फसवणूक करणारं रॅकेट सुरू असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ठाण्यातील एका उच्चशिक्षित तरुणाच्या हाती काम नसल्यामुळं त्यानं एका खाजगी संस्थेशी नोकरीसाठी संपर्क केला होता. त्यावेळी अझरबैजानमध्ये क्रेन ऑपरेटरचं पदासाठी निवड झाल्याचं सांगत आरोपींनी तरुणाला सुरुवातीला २५ हजारांची मागणी केली. त्यानंतरही आरोपींनी गलेलठ्ठ पगाराच्या नोकरीचं आश्वासन देत ९५ हजार रुपयांना गंडा घातला. ९५ हजार रुपये भरूनही नोकरी न मिळाल्यानं पीडित तरुणानं ठाण्यातील कापुरबावडी पोलिसांत तक्रार दाखल केली असून त्यानंतर आता पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.

आरोपींनी तरुणाकडून पैसे उकळताना त्याला बनावट ऑफर लेटर आणि बनावट विमानाचं तिकीट दिलं होतं. परंतु तरुणानं त्याची तपासणी केली असता सर्व कागदपत्रं फेक असल्याचं त्याच्या लक्षात आलं. त्यानंतर त्यानं आरोपींशी संपर्क केला असता त्यांनी कार्यालय बंद करून सीमकार्डही तोडून फेकल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. या प्रकरणात अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेलं नसून प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

IPL_Entry_Point