मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  प्रजासत्ताक दिनी खळबळ; बीडच्या माजी सैनिकाचा मंत्रालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न

प्रजासत्ताक दिनी खळबळ; बीडच्या माजी सैनिकाचा मंत्रालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jan 26, 2023 01:20 PM IST

Youth attempt to suicide : बीडमधील माजी सैनिकाने मुंबईत मंत्रालयासमोर आत्महत्येचा आत्मदहनाचा प्रयत्न केला. यामुळे खळबळ माजली आहे.

मंत्रालयासमोर बीडच्या माजी सैनिकाचा आत्महत्येचा प्रयत्न
मंत्रालयासमोर बीडच्या माजी सैनिकाचा आत्महत्येचा प्रयत्न

मुंबई – देशभर ७४ व्या प्रजासत्ताक दिनाचा उत्साह सुरू असताना बीड जिल्ह्यातील एका तरुणाने मंत्रालयासमोर एका तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. तेथे तैनात पोलिसांनी वेळीत या तरुणाला ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

सुरेश मुंडे असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. सुरेशने मंत्रालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. मरीन ड्राइव्ह पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. सुरेश मुंडे हे माजी सैनिक असून बीडमधील रहिवाशी आहेत. बीड पोलीस फसवणूक प्रकरणामध्ये राजकीय नेत्यांच्या विरोधात कोणतीही कारवाई करत नसल्याने या माजी सैनिकाने मंत्रालयासमोर आत्महत्याचा प्रयत्न केला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. सुरेश मुंडे हा पोलिसांच्या ताब्यात असून त्याची चौकशी सुरू आहे. 

याचबरोबर सोलापूर शहरातील जिल्हा कृषी कार्यालयासमोर युवा भीम सेनेच्या पदाधिकाऱ्यानेही आत्मदहनाचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. जिल्हा कृषी विभागाने बोगस खत कंपन्यांवर कारवाई केली नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा युवा भीम सेनेकडून देण्यात आला . सोलापूर जिल्ह्यातील बोगस खत कंपन्यांविरोधात कारवाई करावी, या मागणीसाठी युवा भीम सेनेकडून आंदोलन करण्यात आले. सोलापूर जिल्हा कृषी अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यासाठी युवा भीम सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी कृषी कार्यालयाच्या इमारतीसमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी मध्यस्थी करून आत्मदहन प्रयत्न करणाऱ्या पदाधिकाऱ्याला ताब्यात घेतले आहे.

IPL_Entry_Point

विभाग