मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  leopard attack : कसाऱ्यात तरुणाने केले बिबट्याशी दोन हात; हल्ल्यामुळे ग्रामस्थ दहशतीत

leopard attack : कसाऱ्यात तरुणाने केले बिबट्याशी दोन हात; हल्ल्यामुळे ग्रामस्थ दहशतीत

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Nov 23, 2022 11:55 AM IST

leopard attack at Kasara : कसरा येथे एका शेतात काम करत असलेल्या तरूणावर दबा धरून बसलेल्या बिबट्याने हल्ला केला. या तरुणाने न घाबरता थेट बिबट्याशी दोन हात केले. यामुळे बिबट्याने जंगलात धूम ठोकली.

  कसाऱ्यात तरुणाने केले बिबट्याशी दोन हात
कसाऱ्यात तरुणाने केले बिबट्याशी दोन हात

कसारा : कसरा परिसरात बिबट्याने दहशत पसरवली आहे. येथील राड्याचापाडा परिसरात शेतात काम करत असलेल्या एका मुलावर शेतात दबा धरून बसला असलेल्या बिबट्याने हल्ला केला. अचानक बिबट्याने हल्ला केल्यावर या मुलाने घाबरून न जाता थेट बिबट्याशी दोन हात केले. मुलाने केलेल्या प्रतिकराला घाबरुन बिबट्याने जंगलात धूम ठोकली. या हल्ल्यात तरुण जखमी झाला आहे. या घटनेमुळे तरुणाच्या साहसाचे कौतुक केले जात आहे. मात्र, या हल्ल्यामुळे ग्रामस्त मात्र भयभीत झाले आहेत.

मंगेश मोर असे बिबट्याशी दोन हात करण्याऱ्या धाडशी तरुणाचे नाव आहे. मंगेश हा सोमवारी संध्याकाळी शेतात काम करत होता. यावेळी बिबट्याने पाठीमाघून येत त्याच्यावर हल्ला केला. अचानक बिबट्या मागून आल्यामुळे मंगेश सावध झाला. यावेळी त्याने थेट बिबट्यावर प्रतिहल्ला केला. बिबट्याला मिळेलत्या साधनाने त्याने मारण्यास सुरुवात केली. यामुळे बिबट्याने मंगेशला सोडून थेट जंगलात धूम ठोकली. बिबट्याची नखे आणि चाव्यामुळे मंगेश हा जखमी झाला आहे. त्यानंतर मंगेशने घरी जाऊन हा प्रकार घरी सांगताच ग्रामस्थांनी त्याला उपचारांसाठी कसारा आरोग्य केंद्रात दाखल केले. त्याच्या पाठीवर जखम झाली असून उपचार करून डॉक्टरांनी त्याला घरी सोडले आहे. त्याची प्रकृती स्थिर आहे.

अनेक दिवसांपासून दहशत

या परिसरात बिबट्याचा अनेक दिवसांपासून वावर आहे. बिबट्याने पशुधनावर हल्ला करून कुत्रे, कोंबड्या, बकऱ्यां फस्त केल्या आहेत. या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. वनविभागाने या ठिकाणी पिंजरा लावण्याची मागणी त्यांनी केली आहे.

 

 

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या

विभाग