tamhini ghat news : पाण्याशी मस्ती जिवावर बेतली! ताम्हिणी घाटातील प्लस व्हॅलीच्या धबधब्यात उडी मारणाऱ्या तरुणाचा मृत्यू
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  tamhini ghat news : पाण्याशी मस्ती जिवावर बेतली! ताम्हिणी घाटातील प्लस व्हॅलीच्या धबधब्यात उडी मारणाऱ्या तरुणाचा मृत्यू

tamhini ghat news : पाण्याशी मस्ती जिवावर बेतली! ताम्हिणी घाटातील प्लस व्हॅलीच्या धबधब्यात उडी मारणाऱ्या तरुणाचा मृत्यू

Jul 01, 2024 08:43 PM IST

Youth falls off in Tamhini Ghat waterfall : पुण्यातील ताम्हिणी घाटातील धबधब्यात पडून एका तरुणाचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. दोन दिवसांनंतर त्याचा मृतदेह हाती लागला आहे.

आणखी एक दुर्घटना! ताम्हिणी घाटातील धबधब्यात पडून तरुणाचा मृत्यू
आणखी एक दुर्घटना! ताम्हिणी घाटातील धबधब्यात पडून तरुणाचा मृत्यू

Youth falls off in Tamhini Ghat waterfall : लोणावळ्यातील भुशी डॅम परिसरात एकाच कुटुंबातील ५ जण वाहून गेल्याच्या घटनेला २४ तास उलटत नाहीत तोच आणखी एक दुर्घटना समोर आली आहे. ताम्हिणी घाटातील प्लस व्हॅली इथं आज एका तरुणाचा मृतदेह सापडला आहे. इथल्या धबधब्यात पडून त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

स्वप्नील धावडे असं या तरुणाचं नाव आहे. तो शनिवारी त्याच्या जिममधील ३२ मित्रांसोबत ताम्हिणी घाटात सहलीसाठी आला होता. उत्साहाच्या भरात त्यानं ताम्हिणी घाटातील प्लस व्हॅलीच्या धबधब्यात उडी मारली. त्यानंतर वेगानं वाहणाऱ्या पाण्याचा सामना न करता आल्यानं तो धबधब्यावरून खाली कोसळला. त्यातच त्याचा मृत्यू झाला.

स्वप्नीलनं स्वत:हून धबधब्यात उडी घेतली!

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ जून रोजी ही दुर्घटना घडली. दोन दिवसांपासून या तरुणाचा शोध सुरू होता. आज सकाळी त्यांचा मृतदेह सापडला आहे. या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.

व्हिडिओ व्हायरल

या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात स्वप्नील धबधब्यात उडी मारताना दिसत आहे. उडी मारल्यावर आपण पाण्याच्या प्रवाहात अडकल्याचं त्याच्या लक्षात आलं. त्यामुळं तो दगडाला पकडून बाहेर येण्याचा प्रयत्न करू लागला, पण त्याला त्यात यशआलं नाही. पाण्याचा मारा तसाच सुरू राहिल्यानं त्याचा हात सुटला आणि तो पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत गेला व नंतर बेपत्ता झाला.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर