Worli hit and run : मुंबईतील वरळी येथे BMW कारच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या विनोद लाड याचा मृत्यू
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Worli hit and run : मुंबईतील वरळी येथे BMW कारच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या विनोद लाड याचा मृत्यू

Worli hit and run : मुंबईतील वरळी येथे BMW कारच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या विनोद लाड याचा मृत्यू

Jul 29, 2024 02:22 PM IST

Worli hit and run : वरळी येथे बीएमडब्ल्यूने एका तरुणाला जोरदार धडक देत फरफटत नेले होते. या घटनेत जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू झाला आहे.

मुंबईतील वरळी येथे BMW कारच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या विनोद लाड याचा मृत्यू
मुंबईतील वरळी येथे BMW कारच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या विनोद लाड याचा मृत्यू

Worli hit and run : मुंबईत वरळी सीफेस येथे काही दिवसांपूर्वी कावेरी नाखवा यांचा हिट अँड रन अपघातात मृत्यू झाल्याची  घटना ताजी असतांना याच परिसरात दुचाकीवरून जाणाऱ्या एका तरुणाला एका आलिशान बीएमडब्ल्यूने जोरदार धडक दिली होती. तब्बल आठ या तरूणांवर उपचार सुरू होता. मात्र, शनिवारी या तरुणाची  प्राणज्योत मालवली.

विनोद लाड (वय २८) असे या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचं नाव आहे. २० जुलै रोजी  वरळी सीफेस परिसरात ए.जी. खान अब्दुल गफारखान मार्गावर विनोद लाड हा काम संपवून दुचाकीवरून घरी जात असतांना एका व्यावसायीकाच्या बीएमडब्ल्यू मोटारगाडीने पाठीमागून जोरदार धडक दिली. या घटनेत विनोद लाड हा गंभीर जखमी झाला होता. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्याला तातडीने दवाखान्यात भरती करण्यात आले होते. त्याच्यावर नायर रुग्णालयात गेल्या आठ दिवसांपासून अतिदक्षता विभागात उपचार सुरू असतांना शनिवारी रात्री उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली.

कसा झाला अपघात ?

मिळालेल्या माहितीनुसार विनोद हा त्याच्या दुचाकीवरून काम संपवून घरी जात असतांना ठाण्यातील एका अत्तर व्यावसायिकाने वरळी सीफेस लिंक जवळील एका रस्त्यावर त्याच्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. हा व्यावसायिक वरळी येथील फोर सीझन हॉटेलमध्ये कौटुंबिक कार्यक्रमासाठी जास्त असतांना व्यावसायिकाचा चालक किरण इंदुलकर याने विनोदच्या गाडीला जोरदार धडक दिली. या प्रकरणी विनोदच्या चुलत भावाने दिलेल्या तक्रारीनुसार वरळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोन महिन्यात होणार होते लग्न

विनोद हा अतिशय कष्टाळू मुलगा होता. तो घरातील एकुलता एक कमावणारा होता. त्याचे आई वडील लहानपणीच वारले होते. यानंतर त्याने स्वबळावर पदवी शिक्षण पूर्ण करून नोकरी मिळवली होती.तो त्याच्या हिल रोड येथील चुलत बहिणीकडे राहात होता. विनोदचा वीवाह देखील ठरला होता. डिसेंबरमध्ये त्याचे लग्न होणार होते. या साठी त्याने मंगळसूत्र व अंगठी ही विकत घेतली होती. सुखी संसराचे स्वप्न पाहत असताना ते सत्य होण्या पूर्वीच विनोदवर काळाने घाला घातला.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर