मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Parbhani Accident : भरधाव दुचाकी चालवत रिल बनवणं बेतलं जीवावर, भीषण अपघातात तरुणाचा मृत्यू
Two Wheeler Accident In Parbhani
Two Wheeler Accident In Parbhani (HT)

Parbhani Accident : भरधाव दुचाकी चालवत रिल बनवणं बेतलं जीवावर, भीषण अपघातात तरुणाचा मृत्यू

26 January 2023, 19:20 ISTAtik Sikandar Shaikh

Parbhani Road Accident : ध्वजारोहणासाठी चार जण दुचाकीवर बसून निघाले होते. त्यावेळी एकानं रिल तयार करताना झालेल्या अपघातात एका तरुणाला जीव गमवावा लागला आहे.

Two Wheeler Accident In Parbhani : प्रजासत्ताक दिनावेळी ध्वजारोहणासाठी निघालेल्या तरुणाला रिल बनवणं जीवावर बेतल्याची घटना समोर आली आहे. परभणीच्या पाथरी-सोनपेठ मार्गावर झालेल्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळं आता या घटनेमुळं परभणीत शोक व्यक्त केला जात आहे. शंतनू सोनवणे असं अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचं नाव आहे.

ट्रेंडिंग न्यूज

प्रजासत्ताक दिन असल्यामुळं परभणीच्या कानसुर येथील चक्रधर स्वामी विद्यालयाकडे चार तरुण ध्वजारोहणासाठी एकाच दुचाकीवर निघाले होते. त्यावेळी एका तरुणानं मोबाईलवर रिल तयार करायला सुरुवात केली. त्यावेळी दुचाकीवरील नियंत्रण सुटल्यामुळं भरधाव दुचाकीला अपघात झाला. त्यानंतर स्थानिकांनी चारही जखमी तरुणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. परंतु उपचारादरम्यान एका तरुणाचा मृत्यू झाला असून तीन जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.

एकाचा मृत्यू तर दुसऱ्याचा हात तुटला....

पाथरी-सोनपेठ मार्गावर झालेल्या अपघातात शंतनू सोनवणे नावाच्या तरुणाचा मृत्यू झाला असून दुचाकी चालवणाऱ्या स्वप्नीलचा हात तुटून रस्त्यावर पडला. त्यानंतर स्थानिकांनी सर्व तरुणांना तातडीनं नजीकच्या रुग्णालयात दाखल केलं आहे. अपघातात जखमी झालेल्या तिन्ही तरुणांची प्रकृती चिंताजनक असल्याचं बोललं जात आहे.