मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Online Fraud : ऑर्डरसाठी फोन केला अन् बँक खातं झालं रिकामं; मुंबईतील तरुणासोबत धक्कादायक प्रकार
Mumbai Crime News Marathi
Mumbai Crime News Marathi (HT_PRINT)

Online Fraud : ऑर्डरसाठी फोन केला अन् बँक खातं झालं रिकामं; मुंबईतील तरुणासोबत धक्कादायक प्रकार

14 February 2023, 17:34 ISTAtik Sikandar Shaikh

Mumbai Crime News : कुरियर आलं नाही म्हणून कंपनीला फोन केल्यानंतर तरुणाच्या खात्यातून लाखो रुपये काढून घेण्यात आल्याची घटना समोर आली आहे.

Vileparle Mumbai Crime News Marathi : काही दिवसांपूर्वी ऑर्डर केलेलं कुरियर वेळेत न मिळाल्यामुळं त्याची माहिती घेण्यासाठी फोन करणाऱ्या तरुणाला लाखो रुपयांचा ऑनलाईन गंडा घालण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संतोष मुरकुटे असं फसवणूक झालेल्या तरुणाचं नाव असून त्याच्या तक्रारीनंतर विलेपार्ले पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करत प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील अनेक ठिकाणी ऑनलाईन फसवणुकीच्या घटना समोर आलेल्या असतानाच आता पुन्हा एकदा एका तरुणाची फसवणूक करण्यात आल्यामुळं शहरात खळबळ उडाली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मिळालेल्या माहितीनुसार, विलेपार्लेत राहणाऱ्या संतोष मुरकुटे या तरुणानं काही दिवसांपासून काही वस्तूंची ऑनलाईन ऑर्डर केली होती. परंतु ऑर्डर वेळेवर न मिळाल्यामुळं त्यांनी कुरीयर कंपनीला फोन करत ऑर्डरची डिटेल्स जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी बनावट कस्टरम केयरने संतोषला दोन रुपयांचं पेमेंट करण्यास सांगितलं. संतोषने अनोळखी नंबरवर दोन रुपयांचं पेमेंट केलं आणि फोन कट करताच त्याच्या खात्यातून तब्बल एक लाख रुपये काढून घेतल्याचा मेसेज आला. त्यावेळी घाबरलेल्या संतोष यांनी तातडीनं त्याच नंबरवर पुन्हा फोन करण्याचा प्रयत्न केला असता तो नंबर स्वीचऑफ केलं गेल्याचं त्यांच्या लक्षात आलं.

त्यानंतर त्यांनी याबाबतची तक्रार सायबर पोलिसांत दाखल केली आहे. ऑनलाईन फसवणूक झाल्यानंतर संतोष मुरकुटे यांनी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करत प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. याशिवाय पोलिसांनी अज्ञात नंबर आणि बनावट कुरियर कंपनीवर कारवाई केली जाणार असल्याचं सांगितलं आहे.