पेट्रोल चोरीच्या संशयातून तरुणाला बेदम मारहाण करून केली हत्या! पुण्यातील नऱ्हे येथील धक्कादायक घटना
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  पेट्रोल चोरीच्या संशयातून तरुणाला बेदम मारहाण करून केली हत्या! पुण्यातील नऱ्हे येथील धक्कादायक घटना

पेट्रोल चोरीच्या संशयातून तरुणाला बेदम मारहाण करून केली हत्या! पुण्यातील नऱ्हे येथील धक्कादायक घटना

Dec 03, 2024 11:22 AM IST

Pune Narhe murder : पुण्यात नऱ्हे भागात पेट्रोल चोरीच्या संशयातून एका तरुणाला गंभीर मारहाण करून हत्या करण्यात आल्याची घटना सोमवारी घडली.

पेट्रोल चोरीच्या संशयातून तरुणाला बेदम मारहाण करून केली हत्या! पुण्यातील नऱ्हे येथील धक्कादायक घटना
पेट्रोल चोरीच्या संशयातून तरुणाला बेदम मारहाण करून केली हत्या! पुण्यातील नऱ्हे येथील धक्कादायक घटना

Pune Narhe Murder : पुण्यात एकीकडे कोयता गँगची दहशत सुरूच आहे. सिंहगड परिसरातील डोणजे येथे एका माजी उपसरपंचाची हत्या काही दिवसांपूर्वी करण्यात आली होती. ही घटना ताजी असतांना आता पेट्रोलचोरीच्या संशयातून एका तरुणाची हत्या करण्यात आल्याचं उघड झालं आहे. ही घटना नऱ्हे येथे घडली आहे. मारहाणीत हा तरुण गंभीर जखमी झाला होता. त्याला दवाखान्यात भरती केले असता उपचार सुरू असतांना त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

समर्थ नेताजी भगत (वय २० रा. व्यंकटेश्वरा सोसायटी, अभिनव कॉलेज रोड, नऱ्हे) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी त्याचे वडील नेताजी सोपान भगत यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. गौरव संजय कुटे (वय २४) अजिंक्य चंद्रकांत गांडले (वय २०) राहुल सोमनाथ लोहार (वय २३, सर्व रा. मानाजीनगर, नऱ्हे) या आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. तर माजी उपसरपंच सुशांत सुरेश कुटे हा फरार असून त्याचा पोलिस शोध घेत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नऱ्हे येथील मानाजीनगर भागात २५ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता माजी उपसरपंच सुशांत कुटे हे त्यांच्या कार्यालयासमोर समर्थच्या गाडीतील पेट्रोल संपले. यावेळी तो दुसऱ्या दुचाकीतून पेट्रोल काढत होता. यावेळी गौरव संजय कुटे व त्याच्या मित्रांनी समर्थला पेट्रोल काढतांना पाहिले. तो पेट्रोल चोरत असल्याचे समजून त्यांनी समर्थला लाथाबु्क्क्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत समर्थ हा गंभीर जखमी झाला.

त्याला तातडीने खासगी रुग्णलयात भरती करण्यात आले. त्याच्यावर काही दिवसांनपासून उपचार सुरू होते. मात्र, सोमवारी त्याचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. या प्रकरणी समर्थचे वडील सोमवारी पोलिस ठाण्यात तक्रार देण्यास गेले असता पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली, असा आरोप वडील नेताजी भगत यांनी केला आहे. आरोपींनी समर्थ भगत याला मारहाण केल्याचा सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाले आहे. पोलिसांनी आरोपीचे मोबाइल जप्त केले आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर