Pune SSPU University : ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट असणाऱ्या पुणे विद्यापीठात लव्ह जिहादचा आरोप करत एका तरुणाला मारहाण करण्यात आली. दुसऱ्या धर्मातील असणाऱ्या तरुणीशी मैत्री तोडावी या साठी ही मारहाण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणी विद्यापीठाच्या वसतिगृह प्रमुखांकडे लेखी तक्रार देण्यात आली असून या बाबत चतुशृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवारी घडली.
मिळलेलया माहितीनुसार मारहाण झालेला तरुण हा विद्यापीठातील कौशल्य विकास केंद्राचा विद्यार्थी असून तो आणि त्याची मैत्रीण हे दोघे विद्यापीठातील उपहारगृहातून जात असतांना दुचाकीवरुन आलेल्या दहा ते बाराजणांनी त्याला अडवले. यावेळी त्यांनी हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते असल्याचे सांगत विद्यार्थी व त्याच्या मैत्रिणीकडे त्याचे आधारकार्ड मागितले. त्यांना त्यांच्या धर्माबाबत देखील त्यांनी माहिती विचारली. त्यानंतर तू लव्ह जिहाद करतो का ? असा आरोप करुन त्यांनी तरुणीला बाजूला नेत लव्ह जिहादबाबत समुपदेशन केले. यानंतर तरुणाला धमकावून त्याला मारहाण करण्यात आली. यानंतर त्यांनी त्यांच्या कुटुंबीयांच्या फोन वर संपर्क साधला व मुलाला घेऊन जा, असे मारहाण झालेल्या मुलाच्या वडिलांना त्यांनी सांगितले. यानंतर मुलाला वसतिगृहावर नेत त्याची बाग भरून त्याला निघून जाण्यास देखील आरोपींनी सांगितले.
या घटनेचा विद्यापीठातील विविध संघटनांनी निषेध नोंदवला आहे. रिपब्लिकन युवा मोर्चाचे अध्यक्ष राहुल डबाळे म्हणाले, एका मुस्लिम विद्यार्थ्यांसोबत अशा पद्धतीने मॉबलिंचिंग विद्यापीठाच्या परिसरात होणे हे अत्यंत चुकीचा प्रकार आहे. आम्ही या गोष्टीचा विरोध आणि निषेध करतो. जोपर्यंत संबंधित आरोपी पकडले जात नाहीत. तोपर्यंत आम्ही कायदेशीर लढाई लढत राहणार आहोत.
राष्ट्रीय विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष अक्षय कांबळे म्हणाले, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये एक अत्यंत धक्कादायक प्रकार घडलेला आहे. स्किल डेव्हलपमेंट विभागाचा एक विद्यार्थी आपल्या मित्रांसह रिफेक्ट्री पासून वस्तीगृहाकडे जात असताना. त्याला आंबेडकर भवन या ठिकाणी विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी अडवून जबर मारहाण केली आहे. त्याचे आधारकार्ड पाहून तो मुस्लिम असल्याचे लक्षात आल्यानंतर या समूहाने त्याच्यावरती लव जिहाद सारखे खोटे आरोप करत जबर मारहाण केली. यामध्ये संबंधित विद्यार्थी हा गंभीर जखमी झाला आहे. राष्ट्रीय विद्यार्थी काँग्रेसला या घटनेची माहिती मिळताच मी अक्षय कांबळे रात्री उशिरापर्यंत आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते राहुल डबाळे व पुणे शहरातील मुस्लिम पदाधिकाऱ्यांच्या सोबत चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशन येथे उपस्थित राहून गुन्हा दाखल करण्यास भाग पाडले. यापुढील काळात आम्ही पूर्ण ताकतीनिशी या प्रकाराच्या विरोधात कायदेशीर लढाई लढणार आहोत.
संबंधित बातम्या