मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Nagpur: बहिणीला अश्लील मॅसेज पाठवल्यानं भाऊ संतापला; ढिवसाढवळ्या तरुणाला संपवलं

Nagpur: बहिणीला अश्लील मॅसेज पाठवल्यानं भाऊ संतापला; ढिवसाढवळ्या तरुणाला संपवलं

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
May 30, 2023 11:07 PM IST

Nagpur Murder: नागपूरच्या गिट्टीखदान पोलीस हद्दीत तरुणीला अश्लील मॅसेज करणाऱ्या युवकाची हत्या झाली.

Crime
Crime

Nagpur Crime: नागपूरच्या गंगानगर येथे मंगळवारी धक्कादायक घटना घडली. बहिणीच्या मोबाईलवर अश्लील मॅसेज केल्याने संतापलेल्या भावाने ढिवसाढवळ्या एका तरुणाची हत्या केली. यानंतर भावानं गिट्टीखदान पोलिस स्टेशनमध्ये जाऊन आत्मसमर्पण केले. याप्रकरणी गिट्टीखदान पोलीस अधिक तपास करीत आहेत.

कपिल भीमराव डोंगरे (वय, ३७) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर, राहुल बिसेन असे आरोपीचे नाव होते. राहुल हा हा बांधकाम कंत्राटदाराकडे काम करायचा आणि कपिलची मोबाईल शॉप होते. कपिल हा गेल्या काही दिवसांपासून राहुलच्या बहिणीला अश्लील मॅसेज करत होता. याबाबत राहुलने अनेकदा कपिल समजावून सांगितले. परंतु, तरीही कपिलने राहुलच्या बहिणीला मॅसेज करणे सुरुच ठेवले. याच विषयावरुन राहुल आणि कपिल यांच्या मंगळवारी दुपारी पुन्हा झाला. हा वाद विकोपाला गेला कपिलने राहुलला काठीने मारहाण करायला सुरुवात केली. त्यानंतर राहुलने तिच काठी हिसकावून कपिलच्या डोक्यात वार केले. या मारहाणीत कपिलचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेनंतर राहुलने गिट्टीखदान पोलिस स्टेशनमध्ये जाऊन आत्मसमर्पण केले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. पोलिसांनी कपिलचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळच्या रुग्णालयात पाठवले. याप्रकरणी पोलिसांनी राहुलविरोधात गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे.

IPL_Entry_Point

विभाग