Bhandara News: भंडारा हादरले ! वडिलांच्या चौदाव्याला आईनं हार आणला नाही; मुलाने उचलले भयंकर पाऊल
Bhandara News: वडिलांच्या १४ व्याला आईने हार आणला नाही या कारणामुळे भंडारा येथे एका तरूणाने तलावात उडी मारून आपले जीवन संपवले.
भंडारा : भंडारा येथील डोंगरगावात एक दुर्दैवी घटना घडली आहे. १४ दिवसांपूर्वी पतीला गमावल्या नंतर एका आईला आपल्या मुलाला देखील गमवावे लागले. मात्र, याचे कारण ऐकून धक्का बसेल. वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर चौदाव्याच्या दिवशी आईनं त्यांच्या फोटोला घालायला हार आणला नाही, या कारणामुळे मुलाने तलावात उडी मारून आपले जीवन संपवले. या घटनेमुळे संपूर्ण जिल्हा हादरला आहे.
ट्रेंडिंग न्यूज
Mahadev betting app : दुबईत बसून चालवायचा सट्टा बाजार; लग्नात २०० कोटी उधळल्यावर ED चौकशी
रंजीत विजयपाल वासणीक (वय २२) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार विजयपाल वासणीक यांचे १४ दिवसांपूर्वी निधन झाले. ते भंडाऱ्यातील डोंगरगावात येथील रहिवासी होते. विजयपळ यांच्या निधनानंतर सोमवारी त्यांचा चौदावा होता. चौदाव्याचे सर्व विधी सुरू असता मृत पतीच्या फोटोसाठी महिलेने हार आणला नव्हता.
AIDMK vs BJP : भाजपला मोठा धक्का, दक्षिण भारतात विश्वासू मित्राने साथ सोडली
या कारणामुळे चिडून जाऊन रंजीतला राग भरला होता. भर कार्यक्रमात त्याने या बाबत नाराजी व्यक्त केली. एवढेच नाही तर त्याने रागाच्या भरात गावातील तलावात उडी मारत आपले जीवन संपवले. या घटनेची माहिती मिळताच संपूर्ण गाव तलावाजवळ पोहोचले. ग्रामस्थांनी रंजीतचा शोध सुरू केला.
तब्बल ११ तासांच्या शोध मोहिमेनंतर त्याचा मृतदेह सापडला. चौदा दिवसांपूर्वी पतीचा मृत्यू आणि त्यानंतर क्षुल्लक कारणावरुन मुलाने केलेल्या आत्महत्या केल्यामुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. हाताशी आलेल्या मुलाने टोकाचे पाऊल उचलल्याने महिलेसह वासनिक कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
विभाग